मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik : ब्रह्म योगात तूळ राशीच्या लोकांना लाभणार राजाश्रय! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik : ब्रह्म योगात तूळ राशीच्या लोकांना लाभणार राजाश्रय! वाचा चारही राशींचे भविष्य

May 28, 2024 08:50 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 28 May 2024 : सूर्य, गुरु आणि शुक्र यांची युती होत असल्याने एका शुभ योगाची निर्मिती होत आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींसाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा राशीभविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज मंगळवारच्या दिवशी शास्त्रानुसार अनेक योग जुळून आले आहेत. आज मंगळवारच्या दिवसावर गुरुची कृपादृष्टी राहणार आहे. सोबतच सूर्य, गुरु आणि शुक्र यांची युती होत असल्याने एक शुभ योगसुद्धा निर्माण होता आहे. अशात सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार याबाबत जाणून घेऊया.

सिंह

सिंह राशीसाठी आजचा दिवस समाधानकारक असणार आहे. उद्योग-व्यवसायात मात्र लहरीपणा ठेऊन चालणार नाही. तुमच्यातील कलागुण समाजासमोर आल्यामुळे लोकांची चांगली दाद मिळेल. आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा चांगला फायदा होईल. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. अचानक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. मुलांकडून समाधान मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक भविष्याच्यादृष्टीने फायदेशीर ठरेल.

शुभरंग: लाल, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०४, ०७.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे. उद्योग-व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. तुमच्या स्वभावातील लहरीपणा इतरांना थोडा जाचकच ठरणार आहे. एखाद्या गोष्टीत मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. मोठी आर्थिक गुंतवणूक कराल. आपले सर्व व्याप सांभाळून धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये मन रमेल. भांडण वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा जास्तीत-जास्त प्रयत्न करा. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. आशावादी दृष्टीकोनातून सतत सकारात्मक विचार करावा.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०५.

तूळ

आज मंगळावरचा दिवस तूळ राशीसाठी उत्तम असणार आहे. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. व्यापार-उद्योगात वाढ करणारा दिवस राहिल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना राजाश्रय लाभेल. नोकरदारवर्गाच्या मानधनात वाढ होईल. त्यामुळे मन उत्साही राहील. संशोधन क्षेत्रातील मंडळीना मान सन्मान पदवी पुरस्कार प्राप्त होईल. व्यापारात आर्थिक गुंतवणूक मोठया प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. आपल्या मनाप्रमाणे सर्व कार्य घडतील. मित्रमैत्रिणी मधील जुणे वादविवाद संपुष्टात येतील. त्यामुळे मनःशांती लाभेल. मनोरंजन करण्याकडे कल राहील. घरातील वातावरणसुद्धा खेळीमेळीचे राहणार आहे.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिक

वृश्चिक राशीसाठी आज ब्रह्म योगाचा दिवस चांगला असणार आहे. समाजकार्याची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. तुमची समाजातील प्रतिमा आणखी उंचावेल. व्यवसायात आपल्या मतांवर ठाम रहाणार आहात. कामाची गती वाढवण्यासाठी याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कुंटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. जोडीदाराचे नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. महत्वाच्या कामात जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. मोठा आर्थिक लाभ होईल.

शुभरंग: तांबडा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०८.

WhatsApp channel