Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज शुक्ल योग व कौलव करण आहे. या योग-संयोगात आजचा दिवस सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा जाईल. वाचा चारही राशींचे भविष्य!
आज नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. आर्थिक हानी होण्याची संभवना आहे. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्यावी. आर्थिक घडी थोडी अस्थिर होईल जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. परंतु प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल. तुमच्या प्रेमळ आणि मर्यादशील स्वभावाचा इतर लोक फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. घरातील लोकांच्या अरेरावी वागण्यामुळे त्रासून जाल. घरात पाहिजे तेवढे लक्ष द्यायला न जमल्यामुळे घरात सर्वांचीच चिडचिड होईल. मानसिक क्लेश उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा.
शुभरंग: लाल, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०८.
आज जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. साहित्य क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक कायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. कलाकारांच्या कलेला दाद मिळेल. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. तरुणांना प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. परंतु अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही ना याची काळजी घ्यावी लागेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल.
शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०७.
आज रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान सन्मान वाढेल. पुढील काळात आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन बदल घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. आपल्याकडून वाद निर्माण होऊ शकतात. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. आयत्या वेळच्या खर्चासाठी मात्र तरतूद करून ठेवावी लागेल. गुप्तशत्रूंचा त्रास जाणवेल. नोकरीत नको तेथे धडाडी दाखवण्याची गरज नाही. तुमच्या बुद्धीमत्तेवर वरिष्ठ खूष होतील. त्यामुळे काही गोष्टी आपसूकच तुमच्या हिताच्या झाल्यामुळे तब्येत खूष होऊन जाईल.
शुभरंग: भगवा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०४, ०९.
आज राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. झालेले बदल जितके लवकर आत्मसात कराल तेवढा यशाचा आलेख उंचावेल. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल.
शुभरंग: तांबूस, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.