मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik : सिंह राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनामध्ये उद्भवणार समस्या! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik : सिंह राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनामध्ये उद्भवणार समस्या! वाचा चारही राशींचे भविष्य

May 26, 2024 10:12 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 26 May 2024 : चंद्र अहोरात्र धनु राशीतुन आणि शुक्राच्या नक्षत्रा तुन भ्रमण करणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींसाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा राशीभविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya Tula Vrishchik Rashi Bhavishya : जोतिषशास्त्रात ग्रह-नक्षत्रांच्या आधारे राशींचे भविष्य सांगितले जाते. ग्रहांच्या स्थान बदलाने विविध शुभ-अशुभ योग घटित होत असतात. या योगांच्या आधारे राशींचे भविष्य ठरत असते. आजसुद्धा चंद्र आणि मंगळ ग्रहाच्या युतीमधून नवमपंचम योग निर्माण होत आहे. या हालचालींचा परिणाम सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशींवर कसा होणार हे जाणून घेऊया.

सिंह

आज परदेशगमनात अडचणी आल्यामुळे परदेशी जाण्याचे बेत लांबणीवर पडतील. झोपेच्या तक्रारी डोके वर काढतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अविचार होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताणतणात्मक राहिल. मानअपमानाचे प्रसंग घडतील. नोकरीत अनुकुलता राहिल. शासकीय कामकाजारिता लाभदायक दिवस आहे. कायदेशीर कामात विलंब होईल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळणार आहे. प्रेम प्रकरणात विरोधाला सामोरे जावे लागेल. महत्वाची कागदपत्रे मात्र सांभाळा. अथवा गहाळ होण्याची शक्यता आहे. सुखचैनीच्या वस्तूंवरचा खर्च वाढेल.

शुभरंगः लाल, शुभदिशाः पूर्व.शुभअंकः ०५, ०७.

कन्या

आज मुलांच्याबाबतीत गरजेपेक्षा जास्तच विचार कराल. कुटुंबातील सदस्यांची आपापसातील मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्या. कोणताही विषय जास्त ताणू नये. विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. हितशत्रु गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लोकांचा विरोध असहकार्य लाभेल. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल. मित्रमैत्रिणीबरोबर युक्तिवाद टाळावेत. मनात असंतोष निर्माण होईल. आज कोणत्याही प्रकारचे मोठे व्यवहार टाळावेत.

शुभरंगः हिरवा शुभदिशाः उत्तर.शुभअंकः ०३, ०६.

तूळ

तूळ राशींचे लोक आज नोकरी व्यवसायात आपला वेगळा ठसा उमटवाल. रोजगारात तुमची प्रगती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारीवर्गाची व्यवसायात वाढ होईल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. कलाक्षेत्रातील महिला अनुकूल प्रगतीचे शिखर गाठतील. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेने अधिक लाभ होईल. भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.

शुभरंगः पांढरा शुभदिशाः पश्चिम.शुभअंकः ०३, ०९.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किंवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. कामात अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता शुभ योग आहे. व्यापारीवर्गासाठी बर्‍याच संधी प्राप्त होतील. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून आर्थिक लाभ होईल. व्यवसायात मनासारखे यश मिळाल्याने आनंदी रहाल. नोकरीत आपण घेतलेले निर्णय योग्य राहतील. भावंडांकडून नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल.

शुभरंगःभगवा, शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०१, ०८.

WhatsApp channel