Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज शनिवार २५ मे २०२४ च्या दिवशी शनीदेव आपल्या मूळ त्रिकोण राशी कुंभमध्ये विराजमान असणार आहेत. याचा फायदा राशीचक्रातील काही राशींना होऊन दिवस शुभ ठरणार आहे. आज सिद्ध-साध्य योगसुद्धा तयार होत आहे. या सर्वांमध्ये सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार हे जाणून घेऊया.
सिंह राशीच्या लोकांसाठी आज प्रवासयोग जुळून येत आहे. परदेशी जाण्यासंबंधात काही अडचणी असतील तर त्या दूर होतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. कामकाज किंवा रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा निश्चितच करू शकता. सामाजिक मान सन्मान वाढेल. पुढील काळात तुमच्या कार्यक्षेत्रात, आर्थिक, कौटुंबिक बाबतीत परिवर्तन बदल घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. तुमच्याकडून वाद निर्माण होऊ शकतात. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात, परिक्षेत किंवा मुलाखतीत यश मिळेल. नवीन मित्रपरिवार जोडला जाईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल.
शुभरंग: लाल, शुभदिशा: पूर्व.शुभअंकः ०५, ०८.
कन्या राशीसाठी आज लाभकारक दिवस आहे. आज तुम्हाला नशीबाची उत्तम साथ लाभणार आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी चमत्कारिक दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. धार्मिक गोष्टींमध्ये रुची वाढेल. तुमच्या हातून आध्यात्मिक-सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. व्यवहार कुशलतेमुळे तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तुतीस पात्र ठराल. परमेश्वरावर विश्वास आणखी दृढ होईल. मानसिक स्वास्थ लाभेल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.
शुभरंग: हिरवा शुभदिशा: उत्तर.शुभअंकः ०३, ०६.
तूळ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये असलेली लक्ष्मणरेषा ओलांडण्याची शक्यता आहे. अविचाराने भरमसाठ कर्ज काढू नका. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारीकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल.चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करु नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. घाईगडबडीत घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहिल. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. त्यामुळे वाहने जपून चालवा. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि संततीची विशेष काळजी घ्या.
शुभरंग: भगवा, शुभदिशा: आग्नेय.शुभअंकः ०२, ०७.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. हटके गोष्टी करण्याकडे कल राहील. कोणतीही टोकाची भूमिका घेण्याअगोदर सुवर्णमध्य काढावा लागेल. मंगळाच्या प्रभावामुळे स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्यांसाठी शुभयोग आहे. नोकरीत अनुकुलता जाणवेल. शासकीय नोकरदारासाठी लाभदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्यत पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान आणि पुरस्कार मिळतील.
शुभरंग: नारंगी शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०१, ०८.
संबंधित बातम्या