Sinh Kanya Tula Vrishchik : वैशाख कृष्ण पक्षात तूळ राशीला होणार आर्थिक लाभ! वाचा चारही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik : वैशाख कृष्ण पक्षात तूळ राशीला होणार आर्थिक लाभ! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik : वैशाख कृष्ण पक्षात तूळ राशीला होणार आर्थिक लाभ! वाचा चारही राशींचे भविष्य

Published May 24, 2024 09:50 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 24 May 2024 : आज शुक्रवार २४ मे २०२४ रोजी वैशाख कृष्ण पक्षाची सुरुवात होत आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींसाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा राशीभविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज शुक्रवार २४ मे २०२४ रोजी वैशाख कृष्ण पक्षाची सुरुवात होत आहे. तसेच आज चंद्र राहू आणि नेपच्यूनशी नवमपंचम योग करीत आहे. आज शिव व सिद्ध योगसुद्धा जुळून आला आहे. अशातच सिंह, तूळ, कन्या आणि वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कसा असणार हे जाणून घेऊया.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्यावी. अनावश्य खर्च होईल. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. नातेवाईकांशी वैचारिक मतभेद होतील. व्यापारात उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. आनंदावर विरजण पडण्यासारख्या घटना घडतील. मनात एक प्रकारची नाराजी राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासून जाल. सततच्या खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो प्रवास करणेच टाळा.

शुभरंगः लाल, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०६, ०९.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वाहन किंवा घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील ज्येष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योगात प्रगतीचा वेग वाढेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. कला क्षेत्रातील व्यक्तिंना मोठा लाभ होईल. कार्यप्रणाली आणि कल्पना शक्ती यात सुधारणा होईल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आपल्या कुवतीपेक्षा मोठी जबाबदारी स्विकारु नका. आरोग्य आणि मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याबाबत काळजी घ्या.

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०५, ०८.

तूळ

तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात आवश्यक ते बदल करण्याच्या संधी मिळतील. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य आणि ग्रंथप्रकाशनात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा मानसन्मान वाढेल. आपल्या स्वभावातील आळशीवृत्ती टाळावी. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. आपल्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल. नवे काही करण्याचा प्रयत्न कराल. त्या प्रयत्नात उल्लेखनीय यश मिळेल.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिक

आज करिअरमध्ये एखादी गोष्ट करण्याचा निर्धार आणि निश्चयीपणाच्या जोरावर बाजी मारून न्याल. उतावीळपणावर आवर घालावा. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. आपणास प्रवासात लाभ होईल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहिल. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा योग आहे. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या.

शुभरंगः नांरगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०५.

Whats_app_banner