मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik : सिंह राशीच्या लोकांना गुंतवणुकीत होणार दुप्पट लाभ! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik : सिंह राशीच्या लोकांना गुंतवणुकीत होणार दुप्पट लाभ! वाचा चारही राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 23, 2024 09:28 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 23 May 2024 : आजच्या दिवसावर गुरुचा विशेष प्रभाव असणार आहे. आज शिव योगसुद्धा तयार होत आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींसाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा राशीभविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : जोतिष अभ्यासानुसार आजच्या दिवसावर गुरुचा विशेष प्रभाव असणार आहे. आज शिव योगसुद्धा तयार होत आहे. त्यामुळे अनेक राशींवर महादेवाची कृपा असणार आहे. सोबतच आज कूर्म जयंती आणि बुद्धपौर्णिमासुद्धा आहे. अशा या सर्व शुभ योगांत सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी दिवस कसा असेल हे जाणून घेऊया.

सिंह

आज सिंह राशीतील कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी निर्माण होतील. प्रत्येक गोष्टीचे उत्तम चिंतन कराल. आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर मानसन्मानही मिळेल. जमीन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. कोणतीही खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेले एखादे महत्वाचे कार्य अंतिम टप्प्यावर पोहोचेल. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल.

शुभरंगः लाल, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०९.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासाबाबतीत तणाव कमी होईल. सार्वजनिक कार्यात पदप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. युवकांसाठी काळ अतिशय अनुकूल आहे. प्रगतीच्या नवनविन संधी आपल्याला मिळणार आहेत. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागणार आहे. जबाबदारीने काम करा. बुद्धी चातुर्यासोबत वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल. शासकीय कामात सवलती मिळतील. त्यामुळे मनावरचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. व्यावसायिकांनी कस्टमर्सना आकर्षित करण्यासाठी कलात्मक गोष्टी करण्याची आवश्यकता आहे.

शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा आहे. पूर्वी मांडलेले आर्थिक अंदाज आज प्रत्यक्षात उतरतील. उद्योग-व्यवसायात नवीन धोरणे योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. जोडीदारासोबतच्या नात्यात आणि मैत्रीत अधिक विश्वासार्हता येईल. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना आज नवी संधी मिळू शकते. राजकीय व्यक्तींनी भावनेच्या भरात न राहता बुद्धी चातुर्याने कार्य करावे.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०६, ०९.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना आज व्यवसायात योग्य दिशा मिळेल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहेत. त्यांच्या सानिध्यात जुन्या आठवणी ताज्या होतील. वेळ चांगला जाईल. काही लोकांना आज नवीन वाहन घर घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ करुन घ्याल. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावू राहील.प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. घरामध्ये बऱ्याच दिवसांनी आज एखादे शुभ कार्य घडेल. ज्या लोकांचे विवाह जुळण्यात अडचणी येत आहेत त्यांच्या अडचणी आज दूर होऊन लग्न ठरतील. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न असणार आहे.

शुभरंग: भगवा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०८.

WhatsApp channel