Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांचे परदेश भ्रमण घडेल! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांचे परदेश भ्रमण घडेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांचे परदेश भ्रमण घडेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Apr 23, 2024 11:20 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 23 April 2024 : आज २३ एप्रिल २०२४ मंगळवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज मंगळवारी मंगळ मीन या गुरूच्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाचा शनिशी युतीयोग होणार असून, सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

सिंहः 

आज मंगळ शनि योगात रोजगारात घरात एखादी चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खूष रहातील. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. नोकरी व्यवसायात अचानक फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिकतेकडे जास्त कल राहील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगल्यापैकी मूड लागेल. प्रभावशाली व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. आत्म विश्वासात वाढ झाल्याने कोणतेही काम सहजतेने करु शकाल. कुंटुंबातील समस्याकडे दुर्लक्ष न करता त्यावर नियोजन सोडविण्याचा प्रयत्न करा. व्यापारिक वाद संपुष्टात येतील. सरकारी काम वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. मौजमजा करण्याकडे कल राहिल. वाद विवाद टाळावेत. प्रवासातून आर्थिक लाभ होतील. परदेश भ्रमण घडेल. प्रवासातुन आर्थिक लाभ होईल.

शुभरंग: लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०५, ०८.

कन्या: 

आज चंद्रबल अनिष्ट असल्याने तुम्ही श्रद्धाळू असलात तरी तुमच्या विचारांमध्ये कायम एक गोंधळ राहील. तरुणांना प्रेमात पडावेसे वाटेल पण ते व्यक्त करण्याचे धाडस गोळा करावे लागेल. थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल. अवास्तव गोष्टींकडे जास्त आकर्षित व्हाल. खूप सद्भावनेने एखादी गोष्ट करायला जावी आणि पदरी फक्त वाईटपणा यावा असा अनुभव येण्याची शक्यता आहे. व्यापारात नोकरीत रागावर नियंत्रण ठेवा. संयम बाळगुन काम करा. अन्यथा हानी संभवते. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद निर्माण होतील. नवीन खरेदीत पैसे खर्च होतील. व्यापारात प्रसिद्धी आणि यश मिळयाची शक्यता आहे. सामाजिक किंवा साहित्यिक समारंभात भाग घ्याल. भांडण आणी वाढविवाद टाळावेत. पत्नीसोबत वाद घालू नका.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

तूळ: 

आज चंद्र अनुकूल असल्याने स्थिती राहणार आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन केली जाईल. त्याचा फायदा कामासाठी होईल. पैसे मिळाले तरी ठरवलेल्या कारणासाठीच पैसा खर्च कराल. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. कामाच्या ठिकाणी योग्य तेथे कर्तव्य निभावाल. तुमच्या स्वभावातील वेगळे कंगोरे प्रकर्षाने दिसून येतील. कार्यक्षेत्रात वेळेचा चांगला सदुपयोग करून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. कामकाजामध्ये वाढ होईल. विचारा अंतीच काळजी पूर्वक निर्णय घ्या. व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील. महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घडतील. ज्यांच्या भविष्यात फायदा होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीकारक दिनमान आहे. मुलांकडून समाधान लाभेल. आज आर्थिक लाभ होतील.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिकः 

आज मंगळाच्या नक्षत्रातील चंद्र भ्रमणात सरकारी कामकाजामुळे अडलेली कामे पूर्ण होतील. नोकरी व्यवसायात धाडस दाखवाल त्यामुळे कामाची गती वाढून फायदा होईल. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी चालून येतील. व्यापारात नवीन कार्याची योजना आखाल. नोकरीतील नवीन योजना भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. व्यापार चांगला चालेल. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजनेनुसार काम केल्यास फायदा होईल. आईवडिलांशी असलेले संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात अगोदर केलेल्या कामाचा आज आपल्याला निश्चितच लाभ होणार असून आर्थिक आवक वाढणार आहे. मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळण्याचे योग मिळेल.

शुभरंग: नांरगी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.

Whats_app_banner