मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik : कन्या राशीच्या लोकांना आज मिळणार खरं प्रेम! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik : कन्या राशीच्या लोकांना आज मिळणार खरं प्रेम! वाचा चारही राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 22, 2024 08:55 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 22 May 2024 : आज शास्त्रानुसार, गरजकरण योग, विषयोग, विशाखा नक्षत्र असे विविध योग तयार होत आहेत. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींसाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा राशीभविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : एका ठराविक वेळेनंतर ग्रह-नक्षत्र आपली जागा बदलत एका राशीतून दुसऱ्या राशीत राशीपरिवर्तन करत असतात. अशावेळी अनेक योग जुळून येतात. या योगांचा परिणाम राशींवर कमीअधिक प्रमाणात होत असतो. हे योग काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतात. आजसुद्धा गरजकरण योग, विषयोग, विशाखा नक्षत्र असे विविध योग तयार होत आहेत. या हालचालींमध्ये सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कसा असेल हे जाणून घ्या.

सिंह- 

आज मित्रांसोबत गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल. वैवाहिक आयुष्यात कोणतेही टोकाचे निर्णय लगेच घेऊ नयेत. कलाक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यशस्वी रहाल. उद्योगात नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतुक होऊन मान सन्मान वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्वाला वाव मिळेल. नोकरीत बढती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. नातेवाईकांशी असलेल्या संबंधात स्नेह वाढेल. संपत्तीबाबत असलेल्या कामात केलेली धावपळ फायदेशीर राहील. रोजगारात नवीन योजना अंमलात आणाल.

शुभरंगः लाल, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०५.

कन्या- 

आज तुमच्या परदेशाशी संबंधित व्यवहारांना चालना मिळेल. कामाच्या ठिकाणी तरुणांचा आवडत्या व्यक्तीशी परिचय होईल. त्यातून संवाद वाढेल. आणि त्याचे रुपांतर प्रेमात होण्याची शक्यता आहे. मनात उर्जा निर्माण करणारा दिवस आहे. रोजगारात आर्थिक लाभ होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक सामंजस्य राहील. व्यापारात वाढ होवून अनुकुल स्थिती राहणार आहे. वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून कामाला लागा. घर वाहन खरेदीचा योग जुळून येत आहे.

शुभरंग: पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

तूळ- 

आज तूळ राशीचे लोक स्वत:मध्ये असलेल्या कलेला न्याय देतील. सोबतच नवीन कल्पनांचा मागोवा घ्याल. कामानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. कुंटुबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. कुटुंबात सुखद वातावरण निर्माण होईल. खर्चावर काहीसे नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचा योग आहे. आजचा दिवस आर्थिक वृद्धी करणारा ठरेल.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०४, ०७.

वृश्चिक- 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नवनवीन योजना डोक्यात येतील आणि त्या अंमलात आणण्यासाठी आतोनात मेहनत घ्याल . जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे इतरांना तुमचा आदर वाटेल. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. नोकरीत नवीन योजनेवर कार्य कराल. अपूर्ण राहीलेली कामे आज पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. व्यापारात लक्षपूर्वक नियोजन केल्यास वाढ होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

शुभरंगः नारंगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०८.

WhatsApp channel