मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction: तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी! वाचा चार राशींचे भविष्य

Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction: तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी! वाचा चार राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 22, 2024 12:02 PM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 22 April 2024 : आज २२ एप्रिल २०२४ सोमवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज अहोरात्र चंद्र हस्त या शुभ नक्षत्रातून आणि बुध ग्रहाच्या राशीतुन संक्रमण करत आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

सिंहः 

आज अनिष्ट ग्रहमान असल्याने व्यावसायिक व्यक्तींनी आज जपुन पाऊल टाकावे. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून राहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. आत्मविश्वास आणि अतिउत्साही पणा टाळावा. अतिरेक वृत्तीवर आळा घाला. गुढशास्त्रे अध्यात्म वाचनात रस वाटेल. साथीदारांच्या कामावर लक्ष असु द्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. पत्नीशी कुटुंबातील इतर सदस्यांसी मनमुटाव होण्याची शक्यता आहे. मनोबल मानसिक स्वास्थ सांभाळा. वैवाहीक जीवनात वाद जास्त ताणायचे नाहीत हे ठरवायला लागेल. आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. खर्चाचा आकडा थोडा वाढल्यामुळे तसे वाटणे साहजिक असले तरी पैसे मिळणार आहेत. कोणालाही उसने पैसे देण्याचे टाळावे. कोणाला जामीनही राहू नये. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापटपणा वाढेल. अविचार महागात पडेल. आपल्याला मनस्ताप करावा लागेल. 

शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०९.

कन्याः 

आज चंद्र संक्रमणात व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीकरिता अनिष्ट दिवस आहे. मनोबल विचलित होण्याची शक्यता आहे. कायदयाच्या चौकटीन राहुन कामे करावीत. नियम बाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्‌भवतील. कुटुंबापासुन विभक्तीचा योग आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. दुसऱ्यावर अति विश्वास ठेवू नका. जोडीदाराची काही महत्त्वाची कामे रखडतील. घरात आणि घराबाहेर दोन्हीकडे लक्ष द्यावे लागल्यामुळे तारेवरची कसरत करावी लागेल. व्यवसायात एखादी योजना रद्द करावी लागेल. अती संवेदनशील स्वभावा मुळे कधीकधी यांचे नुकसान होऊ शकते. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धैर्याने आणि संयमाने काम करा. 

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

तूळ: 

आज अनुकूल ग्रहयुतीत कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा. कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल.कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. जनमानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. काहींना वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल. आणि कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. परंतु त्यामुळे आपले मनःस्वास्थ्य मात्र हरवून बसाल. अशावेळी नको ते धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

शुभरंगः भगवा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिकः 

आज गजकेसरी योगात जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखक वर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मान सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक सुधारणा झाल्याने मनासारखा खर्च कराल. खरेदी आणि शुभ कामासाठी दिनमान मंगलमय आहे. घरातील वाद संपुष्टात येऊन गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. लोकप्रियता समाजकारणाची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. या क्षेत्रामध्येही मोहाचे क्षण तुमची पाठ सोडणार नसल्यामुळे, विवेक ठेऊन वेळीच सावध राहायला हवे. 

शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०२, ०९.

WhatsApp channel