मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik : अनिष्ट चंद्रभ्रमणात सिंह राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik : अनिष्ट चंद्रभ्रमणात सिंह राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा! वाचा चारही राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 21, 2024 10:04 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 21 May 2024 : आज चंद्र शुक्राची राशी असणाऱ्या तूळ राशीमध्ये असणार आहे. तर दुसरीकडे शुक्र वृषभ राशीत विराजमान होणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींसाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा राशीभविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : जोतिषशास्त्रानुसार, आज चंद्र शुक्राची राशी असणाऱ्या तूळ राशीमध्ये असणार आहे. तर दुसरीकडे शुक्र वृषभ राशीत विराजमान होणार आहे. या राशींच्या स्थानबदलामुळे शुभ योग निर्माण होत आहेत. हे योग काही राशींसाठी प्रभावी तर काही राशींसाठी सामान्य असणार आहेत. त्यामुळेच सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी आज मंगळवारचा दिवस कसा जाणार हे जाणून घेऊया.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा खास नसणार आहे. प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. केलेल्या कामात अपेक्षेनुसार यश लागणार नाही. बडेजावपणा मिरवू नका. व्यापारात व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्याला मिळेल अशी परिस्थिती राहिल. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे करण्याचा प्रयत्न करा. आज अनिष्ट चंद्र भ्रमणात घरापासून दूर राहण्याची स्थिती निर्माण होईल. विनाकारण खर्च वाढेल. घरातील ज्येष्ठ लोकांची काळजी घेणे गरजेचे आहे. वाहन चालवताना सावधानता बाळगा. तुमच्या स्वतंत्र विचाराचे फायदे तोटे दिसून येतील. प्रगतीची वेगवेगळी क्षेत्र तुमच्यासाठी खुली होतील. मानापमानाच्या कल्पना जास्त प्रकर्षाने जाणवतील.

शुभरंगः लाल, शुभदिशाः पूर्व.शुभअंकः ०५, ०७.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. जमीन बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना पूर्वी केलेल्या कार्याचा आता मोबदला मिळेल. नोकरीत दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. विद्यार्थी वर्गानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. जुनी देणी वसूल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील. नोकरदार वर्गांनी सहकाऱ्यांच्या मतांचा आदर करावा. त्यामुळे त्यांचे सहकार्य तुम्हाला लाभेल. तब्येतीवर विशेष लक्ष द्यावे. अथवा जुनाट दुखणी नव्याने त्रास देऊ शकतात. तुमच्या सकारात्मक स्वभावामुळे लोक प्रभावित होतील.

शुभरंगः हिरवा शुभदिशाः उत्तर.शुभअंकः ०३, ०६.

तूळ

तूळ राशीचे लोक आयुष्याचा मनसोक्त आनंद घेण्यावर भर देतील. कुटुंबातील सदस्यांचे तुमच्याविषयी मत चांगले असेल.कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कलाकौशल्याचे कौतुक केले जाईल. एखाद्या शुभकार्यात सहभागी व्हाल. तुमच्या चांगल्या वृत्तीमुळे आणि कार्यामुळे मानसन्मान मिळेल. मनाप्रमाणे यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. व्यापारीवर्गास मोठी आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिनमान आहे. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. तसेच आज षडाष्टक योग जुळून येत आहे. यानुसार राजकीय क्षेत्रात असणाऱ्या लोकांना स्वतःला सिद्ध करता येईल. जनमानसाचा चांगला पाठिंबासुद्धा मिळेल.

शुभरंगः भगवा शुभदिशाः आग्नेय.शुभअंकः ०३, ०९.

वृश्चिक

वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आज अनुकुल दिवस आहे. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता उत्तम योग आहे. व्यापारी वर्गासाठी प्रगतीच्या बर्‍याच संधी प्राप्त होतील. व्यापारात बदलाचे नवीन प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायात यश मिळाल्याने आनंदी रहाल. बौद्धिक क्षमतेच्या जोरावर वरिष्ठांना प्रभावी करण्यात यशस्वी व्हाल. मितभाषी स्वभावामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. आज अनेक नवनवीन अनुभव घायला मिळतील. दिवसभर धावपळीतसुद्धा संध्याकाळी मनःशांती लाभेल.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०१, ०८.

WhatsApp channel