मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांचे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांचे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील! वाचा चारही राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 21, 2024 08:26 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 21 April 2024 : आज २१ एप्रिल २०२४ रविवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज अनंग त्रयोदशी आणि प्रदोष दिन आहे. चंद्र बुधाच्या राशीतुन आणि रविच्या नक्षत्रातुन गोचर करीत आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

सिंहः 

आज चंद्राचा मंगळाशी योग होत आहे. धार्मिक गोष्टींमध्ये पैसा खर्च कराल. आपल्या बोलण्यामुळे गैरसमज होत नाहीत ना याचा विचार करून संवाद साधावा. संकटाशी टक्कर देऊन आपले ध्येय गाठण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आज कुटुंबाची साथ तुम्हाला चांगली मिळणार आहे. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधाच्या कामाला गती येईल. नवीन कल्पनांच्या जोरावर बरेच काही साधून जाल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. प्रोफेसर यांच्यासाठी शुभदिवस आहे. व्यापारात काही नवीन योजना पूर्णत्वास जातील. मित्रमंडळींचे सहकार्य लाभणार आहे.

शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०५, ०९.

कन्या: 

आज चंद्र गोचर शुभ स्थानातून होत आहे. व्यवसायात दुसरा एखादा व्यवसाय चालू करण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट मध्ये पैसा मिळेल. बौद्धीक आणि कलेच्या क्षेत्रात उत्तम प्रगती आणि नावलौकिक लाभेल. नोकरी ठिकाणी वातावरण उत्साही आनंदी राहिल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. त्यामुळे कामाला आपोआपच गती येईल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. फाजिल आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहिल. दुरवरचे प्रवास लाभदायक भौतिक सुख उत्तम मिळेल.

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०२, ०६.

तूळ: 

आज चंद्र मंगळ षडाष्टक योगात प्रत्येक काम फत्ते करणार आहात. संयमाची कसोटी तुम्हाला सांभाळावी लागेल. प्रेमळ आणिपरोपकारी वृत्तीमुळे अनेक लोक जोडले जातील. कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल. कामाचे नियोजन केले तरी त्याची कार्यवाही न केल्या मुळे कामे उलटपालट होऊन जातील. रागाचा पारा एकदम चढल्यामुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. कार्य पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०५, ०९.

वृश्चिकः 

आज चंद्राशी होणारा योग पाहता प्रतिकुल परिणाम येण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे चांगुलपणा असला तरी कधी कधी तुमचे वागणे सहनशक्तीच्या पलिकडे राहील. आपल्या हातून घडलेली एखादी चूक प्रांजळपणे कबूल करून तुम्ही रिकामे होणार आहात. फाजील आत्मविश्वासामुळे तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची कला नजरेत भरण्यासारखी समोर येईल. घरामध्ये स्फूर्तीदायक वातावरण निर्माण होईल. व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारा सोबत वाद विवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. फार ताण घेऊ नका. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. मनावर नियंत्रण ठेवून संयम राखावा. व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी मित्रांची भागीदाराची मदत घ्यावी लागेल.

शुभरंग: केशरी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०७.

WhatsApp channel