Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : जोतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांमध्ये महत्वाच्या हालचाली होत आहेत. यानुसार आज बुध ग्रह वृषभ राशीमध्ये अस्त होणार आहे. तसेच बुधाचा सूर्य आणि शुक्रासोबत त्रिग्रही योग निर्माण होत आहे. या सर्वांमध्ये सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार हे जाणून घेऊया.
सिंह राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना वाव मिळेल. व्यवसायात भावनेपेक्षा व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साध्य होतील. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल. तुमच्या रसिकतेला उधाण येईल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता असून आकस्मिक धनलाभ होण्याचाही योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. नवीन योजनेची सुरुवात कराल. उत्साहपूर्वक कामात रस घ्याल.
शुभरंगः लाल, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०९.
कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढीस लागेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगतीकारक दिनमान आहे. आपला नावलौकिक वाढेल. भूतकाळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. रोजगारात विस्तार करण्यासाठी नवीन योजना आखाल. परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. अंगीभूत कला गुणांसाठी चांगले वातावरण राहिल. संत साहित्य आध्यात्मीक स्वरुपाचे लेखन होईल. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. मात्र तुमच्या वागणुकीमुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील.
शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०५, ०८.
तूळ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. कोणालाही पैसे उधार देण्याचे टाळावे. कोणाला जामीनही राहू नये. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापटपणा वाढेल. अविचार महागात पडेल. एखाद्या गोष्टीसाठी पश्चाताप करावा लागेल. व्यवसायिक व्यक्तींनी आज मात्र जपुन पाऊले टाकावी लागणार आहेत. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून राहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. आत्मविश्वास आणि अतिउत्साहीपणा टाळावा. अतिरेक वृत्तीवर आळा घाला. गुढशास्त्रे अध्यात्म वाचनात रस वाटेल. साथीदारांच्या कामावर लक्ष असु द्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. पत्नीशी कुटुंबातील इतर सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. वैचारिक दृष्टीकोनातून सगळ्यावर मात कराल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होतील. मनोबल उंचावलेले असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. नातेवाईकांकडून शुभ वार्ता ऐकायला मिळतील. नोकरीत आलेली समस्या तुमच्या प्रयत्नामुळे दूर होईल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहिल. मुलांच्या बाबतीत शारिरिक समस्या निर्माण होतील. व्यापारात नविन योजना आखाल त्या फायदेशीर ठरतील. घरगुती वातावरण चांगले राहिल. सकारात्मक दृष्टिकोनातून कामे पार पाडाल.
शुभरंगं: केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०७, ०९.