Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज मोहिनी एकादशीसह द्विपुष्कर योग, सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि हस्त नक्षत्र योगसुद्धा जुळून येत आहे. तसेच आज कन्या राशीतून चंद्रभ्रमण होणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा रविवारचा दिवस. वाचा राशीभविष्य!
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन उत्तमरित्या कराल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. तुमच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जमिनीसंबधीत रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. आजचे दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल. तुमच्यासाठी कमाईचे नवे मार्ग खुले होतील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायिकांना आज मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला प्रगती करणे सोपे होणार आहे. जोडीदाराला एखादी भेटवस्तू देणे उत्तम ठरेल. महत्वाच्या कामात वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.
शुभरंगः लाल, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०५.
कन्या राशीच्या लोकांचा व्यवसायात उत्तम जम बसेल. सार्वजनिक कामची आवड निर्माण होईल. अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे आज पूर्ण होतील. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. तरुणांना प्रेमप्रकरणात यश येईल. एखाद्या प्रकरणात स्वतःच्या मनाने काळजीपूर्वक विचार करुन निर्णय घ्या. साहित्यिक क्षेत्रात आपल्या कार्याचा विस्तार वाढेल. कामाच्या ठिकाणी मात्र लक्ष केंद्रित करावे लागेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. अथवा जुनी दुखणी पाठ धरु शकतात. ताणतणावात्मक परिस्थितीपासून दूर राहा, अथवा मानसिक परिस्थिती बिघडू शकते.
शुभरंग: पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.
तूळ राशीच्या लोकांनी व्यापारात भागीदारासोबत वादविवाद टाळा. अथवा नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या नाहीतर आर्थिक हानी होण्याचा योग आहे. आज तुमच्यावर लक्ष्मीची अवकृपा राहील. छोट्याशा कारणाने मन दुखावेल. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. शारीरिक दृष्टीकोनातून मधुमेह, पोटाचे विकार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या. जोडीदाराशी स्नेहपुर्वक वागा. नोकरदारवर्गाला मात्र आज प्रगतीच्या नव्या संधी मिळतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत संबंध चांगले राहतील. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी असेल.
शुभरंगः नारंगी, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०२, ०४.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. व्यावसायिकांना व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग जुळून येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरीत आर्थिकबाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहिल. सर्वच क्षेत्रातील लोकांना धनलाभाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ कराल. तुमच्या दमदार वक्तृत्वाचा प्रभाव इतरांवर राहील. समाजात तुमचा मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल.आकस्मिक लाभाचा योग आहे. खर्च काही प्रमाणात वाढतील. मात्र कमाईसुद्धा तशी असल्याने सर्वकाही निभावून जाईल. मनःशांती लाभेल. संध्याकाळच्या वेळी मित्रांच्या गाठीभेटी जुळून येतील.
शुभरंगः भगवा, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०८.