Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज आज चंद्र रविच्या राशीतुन आणि शुक्राच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. तसेच चंद्र प्लुटोशी षडाष्टक योग करत आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा शुक्रवारचा दिवस. वाचा राशीभविष्य!
सिंह राशीच्या लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. जोडीदाराचा सल्ला त्याचं वर्चस्व मान्य करावा लागेल. कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल.आज तैतील करणात ग्रहांची अनुकूलता आहे. तुमच्या अंगच्या धडाडीचा मात्र फायदा होईल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. महत्त्वाचे निर्णय लवकर घ्यावेत. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग येतील. कामाच्या ठिकाणी अनेक सुधारणा कराल त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल परंतु हातात पैसे मिळायला थोडा वेळ लागेल. सफलतेचा आनंद मिळणार आहे.
शुभरंगः लाल, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०९.
नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी लागेल. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. जाहिरात मीडिया क्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रहांची अनुकूलता लाभेल. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. आज प्लुटो-चंद्र षडाष्टक योगात प्रचंड बुद्धीमत्ता असूनही स्वतःचे प्रश्न सोडवताना मनाचा गोंधळ उडेल. काही घरगुती गोष्टींमुळे अस्वस्थता वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे थोडा ताण राहील. व्यवसायात मात्र स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. तरुणांना प्रेम आणि कर्तव्य यामध्ये पेचात टाकणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अपेक्षित कार्य पूर्ण करण्या साठी कसरत करावी लागेल.
शुभरंगः हिरवा शुभदिशाः उत्तर.शुभअंकः ०३, ०६.
शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. तुम्हाला नवीन वाहन खरेदीचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल. आज चंद्रबल शुभ राहिल्याने प्रबळ आत्मविश्वास आणि परिस्थितीचा अचूक अंदाज तुमच्या कामाचा दर्जा सुधारून टाकेल. ऐषारामी जीवन जगावे असे वाटेल. घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. त्यासाठी उत्तमोत्तम खरेदी कराल. विवाहेच्छूना आपला साथीदार निवडण्याची संधी मिळेल. कला आणि बुद्धी यांचा संगम होऊन खूप चांगल्या कलाकृती तयार कराल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल.
शुभरंग: गुलाबी शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०६, ०९.
वृश्चिक राशीच्या युवकांसाठी काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहेत. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागणार आहे. जबाबदारीने काम करा. त्याच बरोबर वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदोपत्री तपासणी काळजी पूर्वक करणे आवश्यक आहे. आज ग्रहयोग अनुकूल आहेत. नोकरी व्यापारात सरकारी कामकाजामुळे काही कामे अडली असतील तर ती पूर्ण होतील. काही सवलती मिळायच्या असतील तर त्या मिळून जातील. व्यवसायात गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी खास योजना आखाल. वरिष्ठांची मर्जी झाल्यामुळे प्रमोशनही मिळू शकते. रहाणीमान उंचावण्यासाठी बराच पैसा खर्ची टाकाल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल.
शुभरंग: भगवा शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०८.
संबंधित बातम्या