Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : वृश्चिक राशींना नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील! वाचा चारही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : वृश्चिक राशींना नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : वृश्चिक राशींना नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील! वाचा चारही राशींचे भविष्य

Apr 17, 2024 10:52 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 17 April 2024 : आज १७ एप्रिल २०२४ बुधवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज चैत्र नवरात्री समाप्ती आणि रामनवमी आहे. चंद्र अहोरात्र बुधाच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

सिंह: 

आज चंद्र शुभस्थानातून भ्रमण करतोय. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. प्रेमप्रकरणामध्ये तरुणांना यश मिळेल. व्यवसायात पार्टनरच्या दुटप्पी वागण्याचा थोडा त्रास होईल. जीवनाकडे पहाऱ्याचा दृष्टीकोन खेळकर हवा. प्रवासयोग परदेशी जाण्या संबंधात काही कामे अडली असतील तर ती पार पडतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. निश्चितच कामकाज किंवा रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान सन्मान वाढेल. पुढील काळात आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन बदल घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. आपल्याकडून वाद निर्माण होऊ शकतात. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल.

शुभरंग: लालसर, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०८.

कन्याः 

आजचं चंद्रबल पाहता आपल्या महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. लेखकांच्या लिखाणाला उत्तेजन मिळेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आध्यात्मिक उन्नती होऊन उपासनाही चांगली होईल. भाग्योदयकारक दिनमान आहे. आज आपणास नशीबाची साथ लाभणार आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. व्यवहार कुशलतेमुळे आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तुतीस पात्र ठराल. परमेश्वरवर विश्वास दृढ होईल. मानसिक स्वास्थ लाभेल.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

तूळ: 

आज प्लुटो-चंद्र योगात शेअर मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र जोखीम घेण्याचे टाळावे. तुमच्या विक्षिप्त स्वभावाचा फायदा इतर घेणार नाहीत याची काळजी घ्या. स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये असलेली लक्ष्मणरेषा ओलांडण्याची शक्यताआहे. अविचाराने कर्ज काढू नका. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल.चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहिल. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि संततीची विशेष काळजी घ्या.

शुभरंग: भगवा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिकः 

आज चंद्राचं अशुभ स्थानातील चंद्रभ्रमणात दिवस मध्यम स्वरूपाचा राहिल. कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या दुटप्पी वागण्याचा त्रास होईल. अडचणीच्या काळात मध्यस्थांची मदत होईल. छोटी मोठी सवलत मिळण्यासाठी वरिष्ठांना खूष ठेवावे लागेल. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहिल. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करु नका.

शुभरंग: तांबूस, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.

Whats_app_banner