Sinh Kanya Tula Vrishchik: कन्या राशीच्या लोकांची जुनी देणी वसूल होणार! वाचा चारही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik: कन्या राशीच्या लोकांची जुनी देणी वसूल होणार! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik: कन्या राशीच्या लोकांची जुनी देणी वसूल होणार! वाचा चारही राशींचे भविष्य

May 15, 2024 09:53 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 15 May 2024 : आजच्या दिवशी चंद्र कर्क आणि सिंह या गुरुच्या राशींमधून भ्रमण करणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींसाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा राशीभविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज बुधाष्टमीचा दिवस आहे. आजच्या दिवशी चंद्र कर्क आणि सिंह या गुरुच्या राशींमधून भ्रमण करणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा बुधवारचा दिवस. वाचा राशीभविष्य!

सिंह

सिंह राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. डोक्यात असलेल्या नवीन कल्पना नक्की मांडा. तुम्हाला कामात सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग जुळून येत आहेत. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील.पोलिस सैन्यातील व्यक्तींकरीता कर्मस्थ मंगळामुळे पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल. शनि आणि चंद्राच्या युतीमध्ये तुम्हाला आज आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. मात्र अहंकारी वृत्तीचा त्याग करा. कामाच्या बाबतीत ध्येय निश्चित करा. महत्वाच्या कामात वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लाभेल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. थोरांचे निर्णय लाभदायक ठरतील. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील.

शुभरंग: लाल शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०८.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. वरिष्ठ मंडळी तुमच्या कामाच्या बाबतीत समाधानी असतील. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. सरकारी योजना अंमलात आणल्या जातील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील . कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. चंद्रबल उत्तम असल्याने आज तुमच्यासाठी अंत्यत शुभ दिवस आहे. व्यापाऱ्यांनी कौटुंबिक आयुष्यात विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मेहनत आणि कुठल्या ही कार्याच्या प्रति तुमचा कल पाहून तुमचे कौतुक होईल. तुमच्या क्षेत्रातील मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात. आकस्मिक धनलाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. नोकरदारवर्गाला पदोन्नतीचा योग आहे.

शुभरंग: पोपटी शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०१, ०४.

तूळ

तूळ राशीच्या लोकांचे मन कार्यक्षेत्रात मग्न राहिल. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणि संततीसौख्यही उत्तम असेल. घरामध्ये आनंददायी वातावरण राहिल. स्वभावातील गुणदोष मात्र टाळावेत. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. शासकिय योजनेतून लाभ होईल. ध्रुव योगात आज तुमच्यासाठी दिनमान उत्तम राहील. वडिलधाऱ्या व्यक्तीपासून आर्थिक लाभ होतील. नोकरीत असाल तर बढतीचे योग आहेत. लोकांना पटेल असेच वक्तव्य करा. विलासी वस्तूंची खरेदी कराल. तुमचा आत्मविशास वाढीस लागेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन योजना आखल्या जातील. तुमच्य कल्पनांना साथीदारांकडून साथ लागेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकाकडून सहकार्य लाभेल.

शुभरंग: भगवा, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०४, ०७.

वृश्चिक

वृश्चिक राशीतील लोक वाहन खरेदीचा विचार करत असतील तर आजचा दिवस शुभ आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. नवीन कामकाज सुरु करण्यासाठी आज अनुकूल दिवस आहे. एखाद्या गोष्टीत ठाम निर्णय घेऊ शकाल. नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल. पण वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे संभ्रम होईल. घरामध्ये एकमेकांच्या विचारांमध्ये तफावत जाणवेल. नोकरीत व्यापारात आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकी साठी दिवस उत्तम राहील.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.

Whats_app_banner