Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज मंगळवार १४ मे २०२४ रोजी चंद्र संक्रमणासोबतच सूर्य संक्रमणसुद्धा होणार आहे. सूर्य आज मेष राशीतून वृषभ राशीमध्ये संक्रमण करणार आहे. सूर्याच्या संक्रमणाने आज गुरुआदित्य योगाची निर्मिती होत आहे. गुरुआदित्य योगाचा प्रभावात सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!
सिंह राशीसाठी आजचा दिवस त्रासदायक असणार आहे. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद होतील. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. मानसिक उत्तेजना व विद्रोह वाढेल. आज व्यापार रोजगारात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वादविवाद टाळा. देवाणघेवाण करताना सावधानता बाळगा. व्यापार व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. व्यवहार करताना जपून करावेत. दुर्घटना गंभीर दुखापतीची शक्यता आहे. आज अनिष्ट चंद्रभ्रमणामुळे आपल्या स्वभावात चंचलता निर्माण होईल. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अस्वस्थ वाटेल. अविचार महागात पडेल. भागीदारीच्या व्यवसायात एकमेकांशी पटणे जरा अवघड जाईल. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील.
शुभरंग: लाल शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०४, ०७.
कन्या राशीसाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कुंटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. जोडीदाराला नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून महत्वाच्या कार्यात सहकार्य लाभेल. अनपेक्षितपणे मोठा आर्थिक लाभ होईल. आज प्लुटो-चंद्र प्रतियोगात व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. कामाचा दर्जा सुधारेल. समाजकारणाची आवड असल्यामुळे ज मानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. व्यवसायात आपल्या मतांवर ठाम राहणार आहात. कामाची गती वाढवण्यासाठी याचा निश्चित उपयोग होऊ शकतो.
शुभरंग: पोपटी शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०५, ०९.
तूळ राशीसाठी आज अडचणीत आणणारा दिवस आहे. नोकरीत अतिउत्साही आणि अतिरेकपणा टाळा. मानसिक स्वास्थ सांभाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईल. व्यापारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल. आज वृद्धी योगात व्यापारात अतीउत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेली गुंतवणूक धंद्याच्यादृष्टीने फायदेशीर ठरेल. घरगुती समारंभासाठी वेळ काढावा लागेल. भावंडांशी वाद संभवतात. कागदोपत्री करार करताना तज्ज्ञांचे सल्ले घ्या. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मानसिक दृष्टीकोनातून तणाव जाणवेल.
शुभरंग: भगवा शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. मुलांकडून समाधान मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल.आज वृद्धी या शुभ योगात अनुकुल स्थिती राहणार आहे. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. उत्तम कल्पना शक्तीमुळे कलाकारांना चांगला वाव मिळेल. व्यवसायात मात्र लहरीपणा ठेऊन चालणार नाही. तुमच्यातील गुण समाजासमोर आल्यामुळे लोकांची दाद चांगली मिळेल. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याच्यादृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
शुभरंग: भगवा शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०७.
संबंधित बातम्या