मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik : सिंह राशीला आज वाहन खरेदीचा योग! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik : सिंह राशीला आज वाहन खरेदीचा योग! वाचा चारही राशींचे भविष्य

Jun 13, 2024 10:34 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 13 June 2024 : आज गुरुवारच्या दिवशी चंद्रावर पूर्णपणे शनीचा प्रभाव असणार आहे. सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशींवर याचा काय परिणाम होणार पाहूया.

सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज गुरुवार १३ जून २०२४ रोजी शनि चंद्राशी युती करत नवमपंचम योग निर्माण करत आहे. त्यामुळे आज दिवसभर चंद्रावर शनिचा पुर्ण दृष्टीयोग असेल. आज शनी प्रभावात गुरुवारचा दिवस सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी कसा असणार ते जाणून घेऊया.

सिंह

आज जोडीदाराचे सहकार्य उत्तम राहील. नोकरी व्यवसायात हव्या असलेल्या संधी मिळतील. कला आणि संगणक क्षेत्रात असणाऱ्यांनी येणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा. आपल्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. मित्र मैत्रिणींकडून चांगली साथ लाभेल यात शंका वाटते. नवनविन प्रलोभने येत राहतील. आपली मानसिकता विचलित करणाऱ्या घटना घडतीत. व्यापारात काळजी पूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे. मोठ्या सांपत्तिक उलाढालीत आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.

शुभरंगः लाल, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०५, ०७.

कन्या

चंद्र-बुध योगात व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. प्रत्यक्षात न उतरणारी स्वप्ने रंगवल्यामुळे अपेक्षा भंगाला तोंड द्यावे लागेल. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमत्ता संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. क्रिडा क्षेत्रातील व्यक्तिंना योग्य संधी चालून येतील. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. जुने मित्र सहकारी भेटतील. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. मिळालेले लाभ योग्य पद्धतीने उपयोगात आणावेत. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडथळे निर्माण होतील.

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०९.

तूळ

उद्योग व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत मानाच्या जागा मिळतील. नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. मनावरचा ताण बर्‍यापैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचे चांगले सहकार्य मिळणार आहे. त्यांच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे निश्चितच शक्य होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढा राहिल. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. कुटुंबातील सदस्याचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल.

शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०४, ०८.

वृश्चिक

व्यवसायात कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. परदेशाशीसंबंधित व्यवहार असणाऱ्यांना दिवस फायदेशीर ठरेल. करिअरमध्ये एखादी गोष्ट करण्याचा निर्धार आणि निश्चयीपणाच्या जोरावर बाजी मारून न्याल. उतावीळपणावर आवर घालावा. व्यापारात महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. तुम्हाला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. अचानक प्रवास घडेल. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहिल. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहेत. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या.

शुभरंगः नांरगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०५.

WhatsApp channel