Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज रविवार १२ मे २०२४ रोजी शनीदेव आपल्या मुख्य त्रिकोण राशी कुंभमध्ये विराजमान असणार आहेत. त्यामुळे आज शशी राजयोग घटित होत आहे. सोबतच आज चंद्र मिथुन राशीतून कर्क राशीत संक्रमण करणार आहे. अशात सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!
सिंह राशीसाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरणार आहे. एखाद्या कामात अनपेक्षित यश मिळेल. नातेवाईकांशी संपर्क येऊन भेटवस्तू मिळू शकते. मात्र शुल्लक गोष्टींमुळे आपल्याला मनस्ताप करावा लागेल. व्यावसायिक व्यक्तींना मात्र आज जपुन पाऊले टाकावी लागणार आहेत. उद्योगधंद्यातसुद्धा काही व्यवहार अनपेक्षित लाभदायक ठरणार आहेत. नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून रहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. आत्मविश्वास आणि अतिउत्साहीपणा टाळावा. अतिरेक वृत्तीवर आळा घाला. गुढशास्त्रे अध्यात्म वाचनात रस वाटेल. व्यवसायातील भागीदारांच्या कामावर लक्ष असु द्या.
शुभरंगः लाल, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०९.
कन्या राशीसाठी मध्यम स्वरुपाचा आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीकरिता अनिष्ट दिवस आहे. मनोबल विचलित होण्याची शक्यता आहे. कायदयाच्या चौकटीन राहुन कामे करावीत. नियम बाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्भवतील. कुटुंबापासून विभक्तीचा योग आहे. आज कोणत्याही व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. अथवा नुकसान सहन करावा लागू शकतो. जोडीदारासोबत मात्र संबंध चांगले राहतील. मनमोकळेपणाने संवाद झाल्याने नाते अधिक दृढ होईल. अध्यात्मिक कार्यांमध्ये आनंदाने सहभाग घ्याल. धार्मिक गोष्टींमध्ये स्वारस्य वाढेल.
शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०५, ०८.
तूळ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. द्विधा मनस्थितीमध्ये नको ते धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. हातात घेतलेल्या कामात मनाप्रमाणे यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा. एखाद्या प्रकरणातील कायदेशीर बाबी काळजीपूर्वक पूर्ण करा. तुमच्यासाठी मिळकतीचे नवे मार्ग खुले होतील. त्यामुळे आर्थिक स्त्रोत वाढेल.कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.समाजात तुमची प्रतिमा उंचावून मानसन्मान वाढेल.
शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. मनासारख्या गोष्टी घडण्याकडे कल राहील. मात्र सामाजिक क्षेत्रामध्येही मोहाचे क्षण तुमची पाठ सोडणार नसल्यामुळे विवेक बुद्धी ठेऊन वेळीच सावध रहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखक वर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मान सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन योजनेची सुरुवात कराल. घरामध्ये अनेक दिवसांपासुन सुरु असलेले मतभेद संपुष्ठात येऊन प्रेम वाढीस लागेल.
शुभरंगं: भगवा, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०७, ०९.
संबंधित बातम्या