Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आजच्या चंद्रभ्रमणात चंद्र मंगळशी संयोग करीत आहे. या संयोगातून नवमपंचम योग घटीत होत आहेत. या शुभ योगात आजचा दिवस सिंह, कन्या,तूळ आणि वृश्चिक राशीसाठी कसा जाणार ते जाणून घेऊया.
कोणत्याही प्रश्नाची उकल तुमच्याकडून फार चांगली होत असल्यामुळे अनेक जणांचे सल्लागार बनाल. मानसिक आरोग्य उत्तम राहणार आहे. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील.
शुभरंग: लाल, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०८.
आज कामाच्या व्यापातूनसुद्धा वेळ काढून जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची चांगली साथ मिळेल. त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. शासकीय सेवेतील मंडळीनादेखील उत्तम दिनमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराटी होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. दुसर्याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहिल.
शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०७.
नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. इतरांवर अवलंबून राहू नका. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. तुमची निरीक्षणक्षमता आणि कल्पनाशक्ती यांचा वापर योग्य रितीने कराल तर बऱ्याच समस्या सुटतील. पैशाची कामे होतील. तुम्हाला अनुकूल वातावरण निर्माण होईल. शासकीय नोकरदारासाठी फलदायी दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्यत पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल.
शुभरंग: भगवा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०१, ०८.
एखाद्या कार्यात लगेच यश मिळेल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. तरुणांना प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. परंतु अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही ना याची काळजी घ्यावी लागेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. तुमची कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. साहित्य क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहिल. दुरवरचे प्रवास घडतील.
शुभरंग: नारंगी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०९.
संबंधित बातम्या