मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrushchik : सिंह राशीसाठी विनायक चतुर्थी ठरणार खास! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrushchik : सिंह राशीसाठी विनायक चतुर्थी ठरणार खास! वाचा चारही राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 11, 2024 10:15 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 11 May 2024 : आज शनिवार ११ मे रोजी, विनायक चतुर्थी आहे. तसेच, मेष राशीत आज सूर्य, बुध आणि शुक्राचा संयोग दिसून येणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींसाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा राशीभविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : बुध ग्रह आज राहूपासून विभक्त होऊन मेष राशीत प्रवेश करत आहे. हा योग सर्वांसाठीच महत्वाचा आहे. मेष राशीत आज सूर्य, बुध आणि शुक्राचा संयोग दिसून येणार आहे. आज विनायक चतुर्थीदेखील आहे. आज लक्ष्मी नारायण योगसुद्धा जुळून येत आहे. आज शनिवारच्या दिवशी एकत्र जुळून येत असलेल्या या सर्व योगांचा प्रभाव सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीवर कसा होणार हे जाणून घेऊया.

सिंह

सिंह राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. धार्मिक ठिकाणी प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. व्यवहार कुशलतेमुळे तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तुतीस पात्र ठराल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. करिअरमध्ये अनेक नव्या संधी प्राप्त होतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणसाठी अनेक मार्गांनी संधी उपलब्ध होतील. परदेशसंदर्भात काही अडलेली कामे मार्गी लागतील. घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढल्याचे जाणवेल. परंतु तुमच्या समतोल स्वभावानुसार परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. सिनेसृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग येतील.

शुभरंग: लाल, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०८.

कन्या

कन्या राशीसाठी आजचा दिवस विविध घडामोडींचा असणार आहे.काही घटनांमधून मानसिक त्रास होऊ शकतो. घरामध्ये चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. घाईगडबडीत घेतलेले निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक ठरु शकतात. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. त्यामुळे वाहन सावकाश चालवा. कर्ज हवे असणाऱ्यांना आज कर्ज मिळू शकते. कोणत्याही गोष्टीत ऐपतीपेक्षा जास्त खर्च करणे नुकसादायक ठरु शकते. एखादी घटना अचानक घडण्याकडे परिस्थितीचा कल राहील. दिवसभरात घडलेल्या घडामोडी मनावर घेतल्याने मनावरचा ताण वाढेल.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

तूळ

तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. व्यवसायातील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध होतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांसाठी उत्तम काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. इतरांवर अवलंबून राहिल्यास नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. तुमची निरीक्षणक्षमता आणि कल्पनाशक्ती यांचा वापर योग्य रितीने केल्यास बऱ्याच समस्या सुटतील. पैशाची कामे मार्गी लागतील.घरातील सदस्यांसोबत संबंध चांगले राहतील. श्रीगणेशाच्या कृपेने आज दिवस आनंददायी जाईल.

शुभरंग: भगवा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०१, ०८.

वृश्चिक

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. आज शासकीय सेवेतील मंडळीना उत्तम दिनमान आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात भरभराटी होणार आहे. तुमच्या कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. कोणत्याही गोष्टीत दुसर्‍याला जामीन राहू नका अन्यथा फसवणूक किंवा आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. आज चंद्राचे बुधाच्या राशीतुन होणारे भ्रमण पाहता आपल्या व्यक्तीत्वामध्ये सुधारणा करावी असे तुम्हाला सारखे वाटत राहील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. त्यामुळे जोडीदारासाठी विशेष वेळ द्याल. मनोरंजक कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल.

शुभरंग: नारंगी शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०९.

WhatsApp channel