Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : जोतिषशास्त्रात ग्रह-नक्षत्रांच्या राशीपरिवर्तनाने विविध योग घटित होत असतात. या योगांचा सकारत्मक आणि नकारत्मक परिणाम राशीचक्रातील प्रत्येक राशीवर दिसून येतो. आज चंद्रावर मंगळ ग्रहाची चतुर्थ दृष्टी राहणार आहे. त्यामुळे रुचक राजयोगाची निर्मिती होत आहे. यामध्ये आजचा दिवस सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी कसा जाणार ते जाणून घेऊया.
आरोग्याच्यादृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. पथ्यपाणी सांभाळावे लागेल. दुसऱ्याला सहकार्य करण्यात तत्पर रहाल. तुमच्यातील गुण समाजासमोर आल्यामुळे लोकांची चांगली दाद मिळेल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष दयावे. पराक्रम आणि क्षमतेमुळे यश व फायदा होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहिल. खर्च मात्र विचार करून करा. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मानसन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल.
शुभरंग: लाल, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०८.
नोकरी व्यवसायात प्रचंड कष्ट घ्यावे लागतील. परंतु तेथील वातावरण मात्र उल्हासित करणारे असेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराला समजून घ्याल. त्यामुळे नाते अधिक घट्ट होईल. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.
तुमचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत भरेल. आपापल्या क्षेत्रात प्रचंड झेप घ्याल. तरुण वर्गाला आपली आवडती व्यक्ती वारंवार भेटेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. तुमची कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. साहित्य क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल.
शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०२, ०७.
प्रवासयोग परदेशी जाण्यासंबंधात काही कामे रेंगाळली असतील तर ती पार पडतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. निश्चितच कामकाज किंवा रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान वाढेल. आगामी काळात तुमच्या कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन बदल घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. आपल्याकडून वाद निर्माण होऊ शकतात. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल.
शुभरंग: तांबूस, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.