Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज चंद्र मेष राशीतुन भ्रमण करणार असून, चंद्र दर्शनाचा योग देखील आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!
आज चंद्रबल लाभल्याने आपला प्रभाव वाढणार आहे. रोजगारात नवीन कामाची आखणी कराल. आपल्या बोलण्यामुळे गैरसमज होत नाहीत ना याचा विचार करून संवाद साधावा. कलाकरांना संधी मिळतील. यशाची जबरदस्त आसक्ती तुम्हाला नेहमीच असते. त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल. बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. आत्मविश्वास वाढीस लागल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय महत्वपूर्ण ठरतील. भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील .सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका घ्याल. शासकीय पोलिस यंत्रणेतील व्यक्तींना उत्तम दिनमान आहे. व्यापार व्यवसायात तेजी राहिल. एकत्रित सहलीचे नियोजन कराल. मुलांच्या हट्टापायी चैनीच्या वस्तूसाठी खर्च करावा लागेल. समाजात केलेल्या कार्याची स्तुती होईल. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.
शुभरंग: लालसर, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०३, ०५.
आज चंद्र अनिष्ट स्थानातून भ्रमण करत आहे. आपण सावधानीपूर्वक वाटचाल करणे गरजेचे आहे. द्विधा मन:स्थितीमुळे तुमचा घोटाळा होऊ शकतो. एकंदरीत तब्येत नाजूक रहाण्याकडे कल राहील. कामाचे नियोजन केले तरी त्याची कार्यवाही न केल्यामुळे कामे उलटपालट होऊन जातील. अतिरिक्त राग आणि वादविवाद टाळा. नोकरीत वारिष्ठांकडून त्रास जाणवेल. नोकरीत विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जामीन राहू नका अन्यथा फसवणुक होईल. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहिल. शारिरिक व्याधी उद्भवतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.
आज गुरू-चंद्र संयोगात लाभदायक दिवस आहे. हातात पैसा आल्या मुळे बरीच देणीही देऊन टाकाल. व्यवसायात कोणतेही काम पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर काही गोष्टींकडे कानाडोळा करायला लागेल. यामुळे रेंगाळलेली कामे गती घेतील. नोकरी धंद्यात काही ठोस बदल कराल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती होईल. कामाप्रती सजग रहा. आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगल कार्य घडतील. विदयार्थ्याच्या विद्याभ्यासात प्रगती होईल. संततीबद्दल समाधान व्यक्त कराल. गृहस्थी जीवन जोडीदाराकडून आणि कुटुंबातील वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. आपली कामे नियोजनात्मक पद्धतीने सुरुळीत घार पाडाल. व्यापारात प्रगतीकारक दिवस असुन अचानक आर्थिक लाभ घडतील. आज केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे.
शुभरंगः भगवा, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०४, ०७.
आज बालव करणात सहकारातुन यशप्राप्ती लाभेल. पैशाची कामे मनासारखी घडतील. संशोधन क्षेत्रात काम करणार्यांची प्रगती होईल. परिस्थितीचा उत्तम आढावा घेताना स्वतःची मर्यादा ओळखून परिपूर्ण काम कराल. कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आपपल्या क्षेत्रात योग्य गुरूवर्य मंडळी भेटतील. पती पत्नीत स्नेह निर्माण होईल. महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील. आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी वेळ मिळेल. आनंद प्राप्त होईल. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील. मानसिक सौख्य लाभेल. आपला छंद जोपासाल. नवनवीन कल्पना सुचतील. दिनमान उत्तम असल्याने अपेक्षेप्रमाणे लाभ होईल.
शुभरंगं: तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०७, ०९.
संबंधित बातम्या