Sinh Kanya Tula Vrishchik Rashi bhavishya: सिंह राशीच्या लोकांची उधारी वसूल होणार! वाचा चारही राशींचे राशिभविष्य-sinh kanya tula vrishchik rashi bhavishya 5 may 2024 leo virgo libra scorpio horoscope ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik Rashi bhavishya: सिंह राशीच्या लोकांची उधारी वसूल होणार! वाचा चारही राशींचे राशिभविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik Rashi bhavishya: सिंह राशीच्या लोकांची उधारी वसूल होणार! वाचा चारही राशींचे राशिभविष्य

May 05, 2024 11:43 AM IST

Sinh Kanya Tula Vrishchik Rashi bhavishya: आज रविवार ५ मे २०२४चा दिवस सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी कसा असणार आहे.

सिंह राशीच्या लोकांची उधारी वसूल होणार! वाचा चारही राशींचे राशिभविष्य
सिंह राशीच्या लोकांची उधारी वसूल होणार! वाचा चारही राशींचे राशिभविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik Rashi bhavishya: राशीभविष्यानुसार आज चंद्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्याठिकाणी आधीपासूनच मंगल, बुध आणि राहू विराजमान आहेत. या सर्व संयोगाने शुभ योग जुळून येत आहे. त्यामुळे १२ राशींवर या योगाचे विविध परिणाम दिसून येणार आहेत. पाहूया आज रविवारचा दिवस सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी कसा असणार आहे.

सिंह

आज प्रदोष दिनी सिंह राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. परदेशी कंपन्यांशी व्यवहार असणाऱ्यांना आजचा दिवस फायदेशीर ठरेल. मागच्यावेळी हातातून निसटलेल्या संधी पुन्हा प्राप्त होतील. वैवाहिक आयुष्यात अनपेक्षितपणे काही घटना घडतील. जोडीदारासोबत समजूतदारपणा ठेऊन वागण्याची गरज आहे. राजकीय सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती होईल. लोकांमध्ये मानसन्मान वाढेल. मित्रांचे आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभणार आहे. भांवडाकडून आर्थिक मदत मिळेल.

शुभ रंग: लाल

शुभ दिशा: पूर्व

शुभ अंकः ०४, ०७

Mesh Vrishabh Mithun Kark Horoscope: मेष राशीसाठी आजचा दिवस आश्चर्यकारक; वाचा चारही राशींचे राशीभविष्य

कन्या

आज कौलव करणात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. जोडीदारासोबत उत्तम संवाद साधला जाईल. त्यामुळे नातेसंबंध सुधारतील. एकमेकांवरील विश्वास आणखी दृढ होईल. मात्र तुमच्या लहरी आणि चंचल स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. जवळच्या लोकांकडून आर्थिक पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना आखाल. त्या योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्राण पणाला लावाल.नोकरदारवर्गाला कामाच्या ठिकाणी आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. संधीचा योग्य फायदा केल्यास भविष्यात उपयोगी ठरेल. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्या. शेअर मार्केटमध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. ऑफिसमध्ये वरिष्ठांचे मार्गर्दर्शन लाभेल.

शुभ रंग: हिरवा

शुभ दिशा: उत्तर

शुभ अंकः ०३, ०५

Todays Horoscope 5 May 2024: चंद्रभ्रमणाने आजचा रविवार बनणार खास; घडणार परदेशवारी! वाचा आजचे राशीभविष्य

तूळ

तूळ राशीसाठी आजचे चंद्रभ्रमण शुभ ठरणार आहे. घरामध्ये नवी वस्तूची खरेदी होऊ शकते. आजच्या दिवशी जुनी येणी वसूल होतील. कुटुंबातील सदस्यांसमोर एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून त्यांची मने जिंकाल. नवीन वस्तूची खरेदी होईल. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. भविष्यात परदेशी जाण्याचा योग येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत संबंध मजबूत होतील. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल.

शुभ रंग: पांढरा

शुभ दिशा: आग्नेय

शुभ अंकः ०२, ०७

अक्षय्य तृतीयेला या ३ राशींच्या लोकांना लागणार बंपर लॉटरी, लक्ष्मीच्या कृपेने पडू शकतो पैशांचा पाऊस

वृश्चिक

चंद्र संक्रमणाचा मोठा प्रभाव तूळ राशीच्या लोकांच्या स्वभावावर पडणार आहे. आज दिवसभर स्वभावात अस्थिरता जाणवेल. कुटुंबातील जवळच्या सदस्यासोबत मतभेद होऊन मानसिक स्वास्थ्य बिघडेल. वडिलोपार्जित संपत्तीसंबंधी वाद निर्माण होतील. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. तापटपणामुळे मानसिक उत्तेजना व विद्रोह वाढेल. व्यावसायिकांनी व्यापारात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वादविवाद टाळा. व्यावसायिक योजना विरोधकांपासून गुप्त ठेवा. आर्थिक देवाणघेवाण करताना व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा.

शुभ रंग: लाल

शुभ दिशा: दक्षिण

शुभ अंकः ०४, ०८

Whats_app_banner