Zodiac Signs and Career : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची एक रास असते. त्या राशीचे काही गुणधर्म असतात, ते संबंधित व्यक्तीमध्ये आढळतात. त्या स्वभावधर्मानुसार त्या-त्या व्यक्तीचं जीवन चालतं, असं मानलं जातं. राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी, व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते. पाहूया सिंह (Leo) राशीसाठी करियरचे कोणते क्षेत्र अनुकूल आहे.
सिंह राशी राशीत केतूचे मघा नक्षत्र शुक्राचे पूर्वाफाल्गुनी आणि रविचे उत्तराफाल्गुनी ही तीन नक्षत्रे असून या राशीचा स्वामी रवि आहे. सिंह राशी अग्नितत्त्वाची व स्थिर आहे. या राशीवर रवि, केतू आणि शुक्र या ग्रहांचे समान प्राबल्य आहे. रविचा या राशीवर सर्वाधिक प्रभाव असतो. अग्नी तत्त्वाची आणि पुरुष प्रधान राशी असून साहसी धैर्यवान सत्याची पुरस्कर्ती अशी आहे. भरपूर ऊर्जा आणि आशावाद असलेली ही रास आहे.
सिंह राशी रवीप्रधान असल्याने या राशीत जन्माला येणाऱ्या व्यक्ती सरकारी, निमसरकारी क्षेत्रात, प्रशासकीय क्षेत्रात किंवा सेवेत विशेषत्वाने आढळून येतात. विशेषतः प्रशासकीय कामात यांना चांगली गती असते. राजकारणी लोकांची बऱ्याच वेळा सिंह राशी दिसून येते. शेअर दलाल, सैन्यदल, सर्जन, डेन्टिस्ट, केमिस्ट, कौन्सिलर, ऑडिटर, न्यायाधिश इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती दिसून येतात.
राजेशाही थाट असणारी ही राशी मोडेन पण वाकणार नाही या वृत्तीमुळे नुकसान करून घेऊ शकते. यांना कोणी गृहीत धरलेलेही आवडत नाही. मनमोकळ्या स्वभावाची, उत्तम धैर्यशक्ती, उत्तम आशावाद व आकर्षक व्यक्तीमत्त्व असते. राशीमध्ये मिरवून घेण्याची, गौरवून घेण्याची वृत्ती दिसून येते. अधिकार लालसा, दिखाऊ वृत्ती, अहंकारीपणा व त्या अनुषंगाने येणारा ढोंगीपणाही दिसून येतो. शरीर उष्ण व पित्त प्रधान असते. धार्मिक सात्विक वृत्तीची असली तरी धार्मिकतेचे अवडंबर न माजवणारी असतात. कर्तृत्ववान असून साधुजनांशी विनम्रतेने वागणाऱ्या परंतु शत्रूंवर विजय मिळवणाऱ्या अशा या सिंह राशीच्या व्यक्ती आढळून येतात.
सिंह राशीची माणसे प्रभुत्व दाखविणारी, अधिकार वाणीने बोलणारी आणि सत्याची आवड असणारी असतात. टापटीप व्यवस्थितपणा हा यांचा गुण असून बेशिस्तपणा यांना आवडत नाही. नेहमीच शिस्तीच्या चौकटीत राहून यांचे वागणे असते. रागीटपणा हा दुर्गुण असला तरी उदारपणा हा गुणसुध्दा यांना कधी कधी घातक ठरतो.
सिंह व्यक्ती प्रशासकीय क्षेत्राबरोबरच पोलीस खाते विशेषतः सुरक्षितता ज्या ठिकाणी असते. अशा ठिकाणची प्रशासकीय जबाबदारी या व्यक्ती चांगल्या रितीने हाताळू शकतात. काही प्रमाणात या व्यक्ती कलाक्षेत्रात सादरीकरण अभिनेते, सिनेमा, अभिनय क्षेत्रातही यांना चांगली गती असते. शेती व्यवसाय, धान्य उत्पादन, बागायती या क्षेत्रातही या व्यक्ती प्रामुख्याने आपले करीअर करु शकतात कारण शुक्राचे आणि केतूचे नक्षत्र या राशीत येत असल्यामुळे शेतीविषयक किंवा फळांची बागायती या क्षेत्रातही या व्यक्ती आपले करीअर करु शकतात. हॉटेल उद्योगाकडेही ह्या व्यक्तींचा कल दिसून येतो.
सिंह राशीच्या व्यक्ती सरकारी माल, औषध उद्योग, लाकूड उद्योग, संबंधीत उद्योग क्षेत्रात प्रामुख्याने दिसून येतात. सिंह राशीच्या दहाव्या अर्थात कर्मस्थानी वृषभ राशी ही राशी येते. वृषभ रास ही स्थिर तत्त्वाची राशी असून शुक्र या राशीचा स्वामी मालकीची आहे. शुक्राच्या प्रभाव असल्याने कलासक्त, मनोरंजन, वाहन उद्योग इत्यादि खाती असून या क्षेत्राशी संबंधीत या व्यक्ती करीअर करतांना दिसतात. सिनेमा उद्योग, चित्रपट वितरक, याशिवाय खाद्य पदार्थाची निर्मिती, सिंह राशीच्या व्यक्ती आढळून येतात. पर्यटन व्यवसाय उद्योगात या व्यक्ती आढळून येतात. दशमातील वृषभ राशीचा स्वामी शुक्र षष्ठ स्थानात असल्यास वरील क्षेत्रात त्या नोकरी करतात. हाच शुक्र सप्तमात असला तरी या व्यक्ती या क्षेत्रासंबंधात स्वतःच्या मालकीचा स्वतंत्र व्यवसाय करताना आढळून येतात.
सिंह राशीचा स्वामी रवि अग्नी तत्वाशी संबंध येतो. यामुळे ऊर्जाक्षेत्र रविकडे जाते. या क्षेत्राशी संबंधीत ऊर्जा निर्मिती, ऊर्जावितरण इत्यादि क्षेत्रात या व्यक्तीचे कर्तृत्व सिध्द झालेले आहे. समाज कारण आणि राजकारण क्षेत्रातही सिंह व्यक्तींना चांगली गती असून सिंह व्यक्ती या दोन्ही क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटवतात. या व्यक्तींचा लोकसंग्रह मोठा असल्यामुळे सामाजिक क्षेत्रात त्यांना चांगली प्रतिष्ठा असते. विशेषतः अशा व्यक्ती सामाजिक संस्था निर्माण करुन समाजातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी समाज प्रबोधन करुन समाजकार्य करण्यासाठी आपले आयुष्य व्यतीत करणारे आढळून येतात. सिंह राशीच्या व्यक्ती नोकरी आणि उद्योग क्षेत्रात अशा दोन्ही क्षेत्रात आपले करीअर करताना आढळतात. आणि आपल्या प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर दोन्ही ठिकाणी यशस्वी झालेल्या पाहायला मिळतात.
संबंधित बातम्या