जोतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्र एका ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन करत असतात. ग्रह-नक्षत्रांच्या या स्थान बदलाने अनेक योग आणि तिथी तयार होतात. ग्रह-नक्षत्राचा शुभ-अशुभ परिणाम राशीचक्रातील बाराही राशींवर पडत असतो. ग्रहांच्या या हालचाली काही राशींसाठी अतिशय शुभ योग तसेच राजयोगाची निर्मिती करत असतात तर काही राशींसाठी अशुभ प्रभावी ठरतात.
ज्योतिष शास्त्रानुसार शुक्राला प्रेम, धन आणि समृद्धीचे प्रतीक समजले जाते. शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे शुक्रादित्य योग निर्माण होत आहे. तब्बल १ वर्षानंतर घटित होत असलेला हा योग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे, या राशींचे भाग्य उजळेल. पाहूया त्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा शुक्रादित्य योग अत्यंत लाभदायक ठरणार आहे. कारण हा योग वृषभ राशीमध्येच जुळून येत आहे. या योगाने तुमचे व्यक्तिमत्व आणखीन खुलून येईल. तुमचा आत्मविश्वास दुपट्टीने वाढेल. याकाळात तुमच्यासाठी कमाईचे विविध मार्ग खुले होतील. शुक्राचा प्रभाव असल्याने आर्थिक समृद्धी येईल. हातात घेतलेल्या प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल.अनेक दिवसांपासून रखडलेली कामे याकाळात पूर्ण होतील. विवाहित लोकांसाठी हा काळ अतिशय उत्तम असणार आहे. जोडीदारासोबत संबंध सुधारुन प्रेम आणि आदर वाढीस लागेल. नोकरीमध्ये वेगाने प्रगती होईल.
सिंह राशीच्या लोकांसुद्धा शुक्रादित्य योगाचा चांगला लाभ मिळणार आहे. शुक्रादित्य योगामुळे या राशीच्या लोकांना चांगले दिवस येऊ शकतात. कारण हा योग कर्म भावावर निर्माण होत आहे. व्यवसायिकांचा व्यवसाय वाढीस लागेल. अचानक धनलाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्या कार्याने प्रभावित होतील. नोकरदारवर्गाला बढती आणि पगारवाढ मिळण्याचा योग आहे. अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. त्यामुळे मनावरचा ताण कमी होईल.
कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्रादित्य योग अतिशय शुभ असणार आहे. कारण हा राजयोग तुमच्या कुंडलीत लाभ आणि कमाईच्या स्थानावर निर्माण होत आहे. त्यामुळे अचानक अनपेक्षित मार्गाने धनलाभ होतील. पैशांची चणचण संपेल. तुमचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढेल. करिअरमध्ये कमी वेळेत जास्त प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा नावलौकिक वाढेल. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून आता आर्थिक फायदा होईल. सरकारी नोकरीत असणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी असणार आहे.