मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Shukra Uday : २९ जून रोजी शुक्र ग्रहाचा उदय; या ३ राशीच्या व्यक्तींनी सावध राहावे, विचारपूर्वक निर्णय घ्यावा

Shukra Uday : २९ जून रोजी शुक्र ग्रहाचा उदय; या ३ राशीच्या व्यक्तींनी सावध राहावे, विचारपूर्वक निर्णय घ्यावा

Jun 22, 2024 07:19 PM IST

Shukra Uday Horoscope 2024 : सुख-समृद्धी, संपत्ती देणारा शुक्र जूनच्या अखेरीस उदयास येणार आहे. ज्याचा १२ राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडेल. पण काही राशीच्या लोकांना खूप सतर्क राहावे लागेल.

शुक्र ग्रहाचा उदय, राशींवर प्रभाव
शुक्र ग्रहाचा उदय, राशींवर प्रभाव

Shukra Uday June 2024 : ज्योतिषीय गणनेनुसार प्रेम, धन आणि सुखाचा दाता शुक्र ग्रहाचा लवकरच मिथुन राशीत उदय होईल . ज्याचा सर्व १२ राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडेल. पंचांग नुसार, संपत्तीचा दाता शुक्र ग्रहाचा उदय शनिवार, २९ जून २०२४ रोजी रात्री ७ वाजून ५२ मिनिटांनी सुमारे ६६ दिवसांनी होणार आहे. २५ एप्रिलला शुक्र वृषभ राशीत अस्त झाला होता. शुक्राच्या उदयामुळे शुभ कार्यांचे आयोजन पुन्हा सुरू होईल. शुक्र ग्रह काही राशींना खूप शुभ परिणाम देईल, परंतु काही राशींच्या समस्या देखील वाढवू शकतो. चला जाणून घेऊया शुक्र ग्रहाच्या उदयामुळे कोणत्या राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल-

मिथुन: 

शनिवार २९ जून रोजी शुक्र मिथुन राशीमध्ये आपल्या उगवत्या स्थितीत असेल. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामात अडथळे येतील. वैवाहिक जीवनात विलंब होऊ शकतो. आर्थिक बाबतीत चढ-उतार होतील. धनप्राप्तीच्या मार्गात अडथळे येतील. घरात अशांतता राहील. भावनिक अस्वस्थता राहील. मन अस्वस्थ राहू शकते.

कर्क : 

शुक्राच्या उदयानंतर कर्क राशीच्या लोकांनाही खूप सावध राहावे लागेल. या काळात वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. राग टाळा. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत विनाकारण वाद घालू नका. आर्थिक बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. मग ते प्रेम, करिअर किंवा आर्थिक संबंधित असो. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.

कन्या : 

शुक्राचा उदय कन्या राशीच्या लोकांच्या समस्या वाढवू शकतो. कोणत्याही कामात रस राहील. भावनिक व्हाल. वैवाहिक जीवनात अडचणी येतील. जोडीदाराशी वैचारिक मतभेद संभवतात. नात्यात कलह वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नका.

शुक्र ग्रहाशी निगडीत उपाय

जर तुमच्या कुंडलीत शुक्र ग्रह कमकुवत असेल तर शुक्रवारी अंघोळीच्या पाण्यात दोन थेंब कापूर तेल टाका. असं सलग ११ शुक्रवार करा. यामुळे नक्कीच तुम्हाला लाभ मिळेल.

पाण्यात चिमुटभर मीठ टाकून अंघोळ केल्यास शरीराभोवती असलेली नकारात्मक उर्जा दूर होते. तसेच अडकलेली कामं झटपट पूर्ण होण्यास मदत होते.

पाण्यात गाईच्या शुद्ध तुपाचे काही थेंब टाकून अंघोळ केल्यास आजार दूर होण्यास मदत होते. तसेच त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.

शुक्र ग्रह बलवान करण्यासाठी ॐ द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम: या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा ५, ११, २१ माळ जप केल्यास फायदा होतो.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel