वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नऊ ग्रहातील प्रत्येक ग्रहाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. हे ग्रह आपल्या गुणधर्मानुसार राशींवर प्रभाव टाकत असतात. शिवाय ग्रह एका ठराविक कालावधीतच एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. या गोचरमधून विविध योगांची निर्मिती होते. शिवाय ग्रह एका राशीमध्ये अस्त होतात तर दुसऱ्या राशीमध्ये उदय होत असतात. ग्रहांच्या उदय आणि अस्ताला विशेष महत्व आहे. ग्रहांच्या उदय-अस्ताने विविध योग घटित होतात. त्याचा प्रभाव राशीचक्रातील बाराही राशींवर पडत असतो. यामध्ये काही राशींवर सकारात्मक परिणाम तर काहींवर नकारात्मक परिणाम होतात.
दैत्यांचा गुरु म्हणून शुक्र ग्रहाला संबोधले जाते. शुक्राला धन, संपत्ती, ऐश्वर्य, सुख, सौंदर्य यांचा कारक मानले जाते. शुक्राच्या प्रभावाने अनेक राशींचे भाग्य उजळते. शुक्र शुभ स्थानात असेल तर त्याच्या गुणधर्मांचा लाभ राशींना मिळत असतो. काही दिवसांपूर्वी शुक्र ग्रह अस्तास गेला होता. दरम्यान आता शुक्र ग्रह पुन्हा उदयास आला आहे. शुक्र कर्क राशीत उदयास आला आहे. आता २०२५ पर्यंत शुक्र उदय स्थितीतच असणार आहे. शुक्राच्या उदयाने शुभ संयोग निर्माण होत आहे. त्याचा फायदा काही राशींना मिळणार आहे. या नशीबवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
शुक्र ग्रहाच्या उदयास येण्याने तूळ राशीच्या लोकांना प्रचंड लाभ मिळणार आहे. कारण शुक्र या राशीच्या कर्म घरात उदय होणार आहे. याकाळात तुमचे सामाजिक क्षेत्र वाढेल. विविध लोकांच्या संपर्कात याला. मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी लाभेल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना आखाल. तुमचे व्यक्तिमत्व आणखीन खुलून येईल. याकाळात तुम्हाला वेळोवेळी धनलाभ होतील. भरपूर पैसा हातात आल्याने आर्थिक स्थिती भक्कम होईल. राहणीमानात मोठा बदल होईल. ऐषोरामी आयुष्य जगण्याकडे कल वाढेल.
मेष राशीच्या लोकांनासुद्धा शुक्र उदयाचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. या राशीच्या चौथ्या घरात शुक्र उदयास आला आहे. त्यामुळे याकाळात तुमच्या भौतिक सोयीसुविधा प्रचंड वाढतील. घरामध्ये सुखसमृद्धी येईल. तुमच्या क्षमतेत प्रचंड वृद्धी होईल. धन येण्याचे विविध मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. मुबलक पैसा उपलब्ध झाल्याने आर्थिक चणचण दूर होईल. घरात महागडी खरेदी होईल. तुमच्या धनसंपत्तीत पूर्वीपेक्षा अधिक वाढ होईल. नोकरदार वर्गाचा पगार वाढेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याचा योग आहे. याकाळात एखादी मालमत्ता खरेदी करू शकता.
तूळ आणि मेषप्रमाणेच मकर राशीच्या लोकांनासुद्धा शुक्र उदय फलदायी ठरणार आहे. या राशीच्या सातव्या घरात शुक्र उदयास आला आहे. त्यामुळे याकाळात तुमच्या वैवाहिक आयुष्यात आनंद आणि उत्साह निर्माण होईल. पतीपत्नीमधील मतभेद दूर होऊन प्रेम वाढीस लागेल. मुलांची त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात चांगली प्रगती होईल. त्यामुळे मनाला समाधान लाभेल. याकाळात अनेक प्रेमीयुगलांचे नाते लग्नापर्यंत पोहोचेल. उद्योग-व्यापारात प्रचंड आर्थिक नफा होईल. नोकरदारवर्गाला वरिष्ठांकडून मोठी जबाबदारी मिळू शकते.
संबंधित बातम्या