Shukra Nakshatra Parivartan June 2024 : सुख, समृद्धी, प्रेम, सौंदर्य, सुखी वैवाहिक जीवन आणि सन्मानाचे कारक शुक्र राशीपरिवर्तनानंतर आता नक्षत्र परिवर्तन करणार आहे. पंचांगा नुसार, शुक्र ग्रहाने १२ जून रोजी मिथुन राशीत प्रवेश केला आहे आणि आता धनाचा दाता शुक्र १८ जून २०२४ रोजी, मंगळवारी पहाटे ४ वाजून १४ मिनिटांनी आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करेल आणि २९ जून पर्यंत या नक्षत्रात राहील. शुक्राचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश होताच काही राशींना जबरदस्त लाभ मिळेल. भौतिक संपत्तीत वाढ होईल. पैसा आणि धान्याचा साठा भरला जाईल आणि आर्थिक चणचण दूर होईल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. चला जाणून घेऊया शुक्राचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश होताच लक्ष्मी देवी कोणत्या राशींवर कृपा करेल?
मेष राशीच्या लोकांना शुक्र ग्रहाच्या राशी बदलामुळे खूप फायदा होईल. व्यवसायात लाभ होईल. पैशाची आवक वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. या काळात केलेल्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभही मिळेल. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. सुख-सुविधांनी युक्त जीवन जगाल.
शुक्राच्या संक्रमणामुळे सिंह राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते. कामातील अडथळे दूर होतील. करिअरमध्ये मोठे यश मिळेल. काही लोकांचा नोकरीचा शोध पूर्ण होईल. तुम्हाला चांगल्या पॅकेजसह नवीन नोकरीची ऑफर मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. समाजात कीर्ती व प्रतिष्ठा वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
तूळ राशीच्या लोकांना शुक्र ग्रहाच्या संक्रमणामुळे मोठा फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळतील. या काळात नवीन कामे सुरू केल्याने उत्कृष्ट परिणाम मिळतील. भागीदारी व्यवसायात खूप प्रगती कराल. सामाजिक प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढेल.
मकर राशीच्या लोकांनाही शुक्र ग्रहाच्या आर्द्रा नक्षत्रात प्रवेशामुळे खूप फायदा होईल. कौटुंबिक त्रासातून सुटका मिळेल. भौतिक सुखसोयी वाढतील. नात्यातील कटुता दूर होईल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. करिअरमधील अडथळे दूर होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या