Venus Transit in Meen Rashi:ज्योतिषशास्त्रात शुक्र हा ग्रह सुख, संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य इत्यादींचा कारक मानला गेला आहे. शुक्र महिन्याभरात एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो. नवीन वर्ष २०२५ च्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये शुक्र आपल्या उच्च राशीत भ्रमण करणार आहे. शुक्राचे मीन राशीचे संक्रमण काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. शुक्र संक्रमणाच्या प्रभावाने या राशींना आर्थिक प्रगती आणि करिअरची प्रगती होऊ शकते. जाणून घ्या, कोणत्या राशींना शुक्राचा या संक्रमणाचा किंवा गोचराचा फायदा होईल.
द्रिक पंचांगनुसार शुक्र २८, जानेवारी २०२५, मंगळवार सकाळी ०७ वाजून १२ मिनिटांनी मीन राशीत गोचर करेल.
मेष राशीच्या जातकांसाठी शुक्राचे मीन गोचर शुभ ठरणार आहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. याबरोबच तुम्हाला जुन्या स्त्रोतांमधून देखील पैसा येईल. थोडक्यात तुमची आर्थिक बाजू भक्कम होणार आहे. या काळात तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच या काळात तुम्हाला गुंतवणुकीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. दरम्यानच्या काळात तुम्ही प्रभावशाली व्यक्तींना भेटू शकता.
वृषभ राशीच्या जातकांसाठी शुक्राचे राशीपरिवर्तन खूपच फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही करत असलेल्या व्यवसायात नफा वाढेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. तुमचे कौशल्य वाढेल. या काळात तुमचे कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. नोकरीत उत्पन्नात वाढ आणि पदोन्नती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कुंभ राशीच्या जातकांसाठी शुक्राचे संक्रमण अत्यंत शुभ ठरणार आहे. शुक्र गोचराच्या प्रभावामुळे कुंभ राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या जातकांना नोकरीच्या चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. तुम्ही कोणाला दिलेल्या पैशांचा परतावा किंवा तुमच्या अडकलेल्या पैशांचा परतावा या काळात शक्य आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या कार्यशैलीत बदल संभवतो.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.