Shukra-Ketu Yuti Effect : प्रत्येक ग्रह राशी आणि नक्षत्र बदलून संक्रमण करतात. यालाच गोचर असेही म्हणतात. काही वेळा एकाच राशीत दोन किंवा तीन ग्रह एकत्र येतात आणि ग्रहांचा शुभ किंवा अशुभ असा योग संयोग तयार होतो. शुक्र आणि केतूचाही असाय संयोग तयार झाला असून, हा संयोग शुभ आहे की अशुभ जाणून घ्या.
शुक्राच्या कन्या राशीत होणाऱ्या संक्रमणामुळे एक प्रभावशाली घटना घडली आहे. शुक्राने सिंह राशीला सोडले आणि २५ ऑगस्ट रोजी सकाळी १ वाजून २४ मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश केला आहे. मायावी ग्रह केतू आधीच कन्या राशीत होता. अशा प्रकारे कन्या राशीमध्ये शुक्र-केतूचा संयोग तयार झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम देश आणि जगावर तसेच मानवी जीवनावर होतो. अशा वेळी लोकांच्या मनात प्रश्न पडतो की केतू-शुक्र युती लोकांसाठी शुभ आहे की अशुभ आहे?
शुक्र-केतूचा संयोग लोकांसाठी चांगला नाही. शुभ आणि अशुभ ग्रहांचा हा संयोग लोकांना कमी सकारात्मक परिणाम देईल. या दोन ग्रहांच्या एकत्र असण्यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात. मानसिक समस्या निर्माण करतात. साखरेची पातळी वाढण्याची समस्या असू शकते. परस्पर संबंधांमध्ये संघर्ष निर्माण होतो. हा संयोग नातेसंबंधांमध्ये गोंधळ निर्माण करणारा ठरतो. शुक्र आणि केतू यांच्या संयोगामुळे विवाहात अडचणी किंवा विलंब होऊ शकतो.
शुक्र-केतू युती १८ सप्टेंबरच्या दुपारपर्यंत कन्या राशीत राहील आणि यानंतर दुपारी २ वाजून ४ मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करेल. अशा प्रकारे कन्या राशीत तयार झालेला शुक्र-केतू संयोग संपेल.
केतू २०२४ मध्ये वर्षभर कन्या राशीत प्रवेश करेल. यानंतर केतू कन्या राशीतून बाहेर पडून १८ मे २०२५ रोजी सिंह राशीत प्रवेश करेल. सिंह राशीत केतूच्या संक्रमणामुळे सर्व १२ राशी प्रभावित होतील, परंतु सिंह राशीच्या लोकांना याचा सर्वाधिक फटका बसेल, कारण केतूचे संक्रमण या राशीत होणार आहे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)