मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Malvya Raja Yog : एक वर्षानंतर जुळून येतोय 'मालव्य राजयोग'! 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस, संपणार दारिद्रय

Malvya Raja Yog : एक वर्षानंतर जुळून येतोय 'मालव्य राजयोग'! 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस, संपणार दारिद्रय

HT Marathi Desk HT Marathi
Jul 05, 2024 09:46 AM IST

जुलैमध्ये अनेक ग्रह राशी परिवर्तन करत विविध योगांची निर्मिती करत आहेत. या योगांचा सकारात्मक आणि नकारत्मक प्रभाव राशींवर पडत आहे.

Malvya Raja Yog : एक वर्षानंतर जुळून येतोय 'मालव्य राजयोग'! 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस, संपणार दारिद्रय
Malvya Raja Yog : एक वर्षानंतर जुळून येतोय 'मालव्य राजयोग'! 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस, संपणार दारिद्रय

वैदिक शास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालींमधून विविध योग आणि राजयोग जुळून येत असतात. ग्रह एका ठराविक वेळेत एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतात. ग्रहांच्या या गोचरमधून निर्माण होणाऱ्या शुभ-अशुभ योगांचा परिणाम राशीचक्रातील बाराही राशींवर होत असतो. त्यामुळे शास्त्रात ग्रहांच्या स्थान बदलाला विशेष महत्व आहे. जुलै महिना ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा आहे. कारण जुलैमध्ये अनेक ग्रह राशी परिवर्तन करत विविध योगांची निर्मिती करत आहेत. या योगांचा सकारात्मक आणि नकारत्मक प्रभाव राशींवर पडत आहे. काही राशींना या योगांचा फायदा होत आहे तर काही राशींना नुकसान सहन करावा लागत आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शुक्र गोचर करत आहे. शुक्राला बुद्धी, ज्ञान, सुखसमृद्धी, ऐश्वर्य, सौंदर्य आणि संपत्तीचा कारक मानला जातो. अशात शुक्राच्या गोचरने एक अत्यंत शुभ राजयोग निर्माण होत आहे. येत्या सप्टेंबरमध्ये शुक्र आपली स्वराशी असणाऱ्या तूळ राशीत गोचर करणार आहेत. यातूनच अत्यंत शुभ अशा मालव्य राजयोगाची निर्मिती होत आहे. हा राजयोग पंचमहापुरुष राजयोगांपैकी एक समजला जातो. या राजयोगामुळे धन, सुख-समृद्धी आणि संपत्तीत प्रचंड वाढ होते. तसेच हा राजयोग लाभलेल्या लोकांची सर्व कामे विना अडथळा पूर्ण होतात. करिअर यशाच्या शिखरावर पोहोचते. यंदाच्या या मालव्य राजयोगाचा फायदा कोणत्या राशींना मिळणार याबाबत आपण जाणून घेऊया.

तूळ

तूळ राशीला मालव्य राजयोग लाभदायक ठरणार आहे. कारण हा योग तूळ राशीच्या लग्न घरात तयार होत आहे. याकाळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. तुमचे व्यक्तिमत्व आणखी उठावदार बनेल. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. शिवाय नोकरी बदलण्याचा विचार असणाऱ्यांना हा काळ अनुकूल आहे. तुम्हाला नव्या नोकरीची ऑफर मिळू शकते. विवाहित लोकांच्या वैवाहिक आयुष्यातील मतभेद दूर होतील. घरात आनंद आणि सुखसमृद्धी येईल. याकाळात अनेक आर्थिक लाभ होतील. त्यामुळे आर्थिक स्थिती भक्कम राहील.

धनु

धनु राशीच्या लोकांना मालव्य राजयोगाचा फायदा मिळणार आहे. कारण हा राजयोग या राशीच्या इन्कम आणि लाभ या स्थानावर निर्माण होत आहे. याकाळात तुमच्यात एक नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होईल. प्रत्येक कामात प्रचंड उत्साह जाणवेल. आर्थिक आवक प्रचंड वाढेल. मिळकतीचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. धनलाभ झाल्याने आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. शिवाय याकाळात गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरणार आहे. घरातील वातावरण खेळीमेळीचे असणार आहे. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांची पूर्ण साथ लाभेल. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते.

कन्या

कन्या राशीलासुद्धा मालव्य राजयोग विशेष फलदायी ठरणार आहे. कारण हा राजयोग या राशीच्या धन आणि वाणी या स्थानावर निर्माण होत आहे. त्यामुळे याकाळात तुमच्या वाणीत प्रचंड सकारात्मक बदल होईल. तुमच्या संवाद कौशल्याने लोक प्रभावित होतील. समाजातील तुमची पदप्रतिष्ठा वाढेल. याकाळात अनेक मार्गाने धनप्राप्ती होईल. अनपेक्षित धनलाभ झाल्याने मन उत्साही राहील. व्यापाऱ्यांना अडकलेले पैसे परत मिळतील. मनात ठरविलेल्या योजना याकाळात प्रत्यक्षात उतरविण्यात यशस्वी व्हाल. हातात भरपूर पैसा आल्याने भविष्याच्या दृष्टीने बचत कराल. प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल.

WhatsApp channel
विभाग