ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशी परिवर्तन अत्यंत महत्वाचे असते. यामध्ये एकूण नऊ ग्रह कार्यरत असतात. यामध्ये शुक्रसुद्धा आहे. शुक्राला सौंदर्य, बुद्धी, धनसंपत्ती, एकनिष्ठता याचा कारक मानले जाते. राशीचक्रातील राशींवर शुक्र ग्रहाचा प्रभाव प्रामुख्याने शुभच असतो. शुक्राच्या प्रभावाने राशींना सुखाचे दिवस येतात. शिवाय त्यांचे व्यक्तिमत्वसुद्धा उठावदार बनते. त्यामुळेच शुक्र ग्रहाच्या हालचालींना अतिशय महत्वाचे स्थान आहे.
वैदिक शास्त्रानुसार आज शनिवार २९ जून रोजी चंद्र मीन राशीत म्हणजेच गुरुच्या राशीत प्रवेश करत आहे. तर दुसरीकडे मिथुन राशीत सूर्य आणि शुक्राचा शुभ संयोग जुळून येत आहे. विशेष म्हणजे या संयोगातून 'शुक्रादित्य राजयोग' निर्माण होत आहे. शुक्रादित्य राजयोगाच्या प्रभावाने राशीचक्रातील काही राशींना आर्थिक फायदा तर होईलच शिवाय कार्यक्षेत्रात घवघवीत यशसुद्धा मिळणार आहे.
शुक्रादित्य योगासोबतच आणखीही काही शुभ योग घटित होत आहेत. तसेच आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. यादिवशीच शुक्रादित्य योग जुळून आला आहे. यासह शोभन योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्यानेसुद्धा दिवसाचे महत्त्व वाढले आहे.
वृषभ राशीच्या लोकांना शुक्रादित्य राजयोगाचा फायदा मिळणार आहे. याकाळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. धनलाभाचे विविध योग जुळून येतील. पैसा हातात आल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. दरम्यान पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांना मौजमस्ती करण्याची संधी मिळेल. अभ्यासात उत्साह आणि एकाग्रता जाणवेल.व्यापार-उद्योगात उत्तम धनलाभ होईल.
शुक्रादित्य राजयोगाचा फायदा सिंह राशीच्या लोकांना मिळणार आहे. आज केलेली आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतूनसुद्धा लाभ मिळणार आहे. अनेक दिवसांपासून अडलेले धन आज परत मिळेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. येत्या काळात तुम्हाला बढती मिळण्याचा योग आहे. अविवाहित लोकांनां विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.
तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्रादित्य योगात आजचा दिवस समाधानकारक असणार आहे. या राशीच्या लोकांनां शनिदेवाच्या कृपेने अधिकाधिक पैसे कमावण्याची संधी मिळेल. तुमचे खर्च कमी होतील आणि कमाईत वाढ होईल. त्यामुळे तुम्ही बचत करण्यात यशस्वी व्हाल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचा योग आहे. व्यवसायात धनलाभ होऊन विस्तार होईल. आर्थिक स्थिती स्थिर असल्याने घरातील वातावरण आनंदी असेल.
संबंधित बातम्या