ग्रह-नक्षत्र या खगोलशास्त्रीय बाबी या आहेत. यांच्या हालचाली खगोलशास्त्राच्या अभ्यासाचा विषय आहे. मात्र ज्योतिषशास्त्रामध्ये याच ग्रह-नक्षत्रांचा संबंध मानवी आयुष्याशी जोडला जातो. ग्रहांच्या हालचाली ज्योतिषीय अभ्यासातदेखील अत्यंत महत्वाच्या असतात. ग्रहांचा थेट प्रभाव राशीचक्रावर पडत असतो. आणि याच राशी मनुष्याचे भविष्य सांगत असतात. त्यामुळेच खगोलशास्त्राप्रमाणेच ज्योतिषशास्त्रातदेखील ग्रह-नक्षत्रांना विशेष महत्व प्राप्त आहे. ग्रहांच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचरने विविध शुभ-अशुभ योग जुळून येतात. या योगांचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम काही राशींवर दिसून येतो.
दरम्यान शुक्र ग्रह लवकरच आपले स्थान बदलत शुभ स्थानात प्रवेश करणार आहे. शुक्राला धन, संपत्ती, ऐश्वर्य, सौंदर्य यांचा कारक मानले जाते. शुक्राच्या या गुणधर्मांचा प्रभाव राशींवर पडत असतो. त्यामुळेच शुक्र गोचरला महत्वाचे स्थान आहे. शुक्र ज्याप्रमाणे राशी परिवर्तन करतो त्याचप्रमाणे नक्षत्र परिवर्तनदेखील करत असतो. येत्या २० जुलै रोजी शुक्र पुष्य नक्षत्रातून निघून आश्लेषा नक्षत्रात गोचर करणार आहे. शुक्राच्या या गोचरने शुभ संयोग निर्माण होत आहे. या संयोगचा फायदा राशीचक्रातील काही राशींना होणार आहे. त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
शुक्राचे आश्लेषा नक्षत्रात गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. याकाळात तुम्हाला कार्यक्षेत्रात प्रगती करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याचा योग आहे. उद्योग-व्यवसायात मोठा आर्थिक नफा होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत असणारे मतभेद दूर होऊन नातेसंबंध सुधारतील. आर्थिक आवक वाढेल. त्यामुळे मन समाधानी राहील. घरातील वातावरण आनंदाचे राहील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
धनु राशीच्या लोकांना शुक्राच्या आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करण्याने विशेष लाभ मिळणार आहे. याकाळात अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. पैशांची आवक वाढलयाने आर्थिक स्थिती भक्कम होईल. नोकरदार वर्गाच्या कामात प्रचंड सुधारणा होईल. याकाळात तुम्हाला पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. घरात भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. धार्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल.
कुंभ शुक्र ग्रहाच्या आश्लेषा नक्षत्रात प्रवेशाचा लाभ कुंभ राशीच्या लोकांनासुद्धा मिळणार आहे. याकाळात कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण राहील. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील. यातून मोठी जबाबदारी पदरात पडण्याची शक्यता आहे. मिळकतीचे विविध मार्ग खुले होतील. अचानक धनलाभ होण्याचे प्रसंग येतील. ऐषोरामी आयुष्य जगण्याकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन प्रकृती उत्तम राहील. मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनमोकळा संवाद होऊन नात्यात गोडवा निर्माण होईल.
संबंधित बातम्या