Shukra Gochar: शनीच्या नक्षत्रात शुक्राचे भ्रमण, या राशींसाठी येणार अच्छे दिन
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Shukra Gochar: शनीच्या नक्षत्रात शुक्राचे भ्रमण, या राशींसाठी येणार अच्छे दिन

Shukra Gochar: शनीच्या नक्षत्रात शुक्राचे भ्रमण, या राशींसाठी येणार अच्छे दिन

Jan 21, 2025 03:18 PM IST

Shukra Gochar: शुक्राचे नक्षत्र संक्रमण १ फेब्रुवारी रोजी शनीच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात होत आहे. शुक्राच्या या परिवर्तनाचा अनेक राशींवर परिणाम होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींवर होणार परिणाम

शनीच्या नक्षत्रात शुक्राचे भ्रमण, या राशींसाठी येणार अच्छे दिन
शनीच्या नक्षत्रात शुक्राचे भ्रमण, या राशींसाठी येणार अच्छे दिन

Shukra Gochar: शुक्राचे नक्षत्र गोचर १ फेब्रुवारी रोजी शनीच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात होत आहे. शुक्राच्या या परिवर्तनाचा अनेक राशींवर परिणाम होणार आहे. तो धन, विलास जीवन, प्रेम आणि भौतिक सुखदेणारा आहे. सध्या शुक्र शनीच्या कुंभ राशीत भ्रमण करत असून, त्यानंतर तो मीन राशीत प्रवेश करेल. यावेळी शुक्र ग्रह देवगुरु गुरू नक्षत्रात विराजमान आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींवर होणार परिणाम.

मेष राशीच्या जातकांना बाळगावी लागेल सावधगिरी

शुक्राचे शनी भ्रमण झाल्याने या गोचराचा अनेक राशींना फायदा होणार आहे. या परिणाम मेष राशीवर होणार आहे. या गोचरामुळे मेष राशीच्या लोकांना काही कामांसाठी सावध राहावे लागणार आहे. मेष राशीच्या जातकांना आरोग्याच्या बाबतीतही काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपल्यासाठी वेळ संमिश्र असेल, परंतु आर्थिक बाबतीत आपल्याला फायदा होईल. परदेशात जाण्याचा बेत आखू शकता. यासाठी आता तुम्ही तिकिटेही बुक करू शकता.

कर्क राशीच्या जातकांना येऊ शकतात आर्थिकदृष्ट्या अनेक समस्या 

शुक्राचे शनी नक्षत्रात गोचर झाल्यामुळे कर्क राशीवर त्याचा विपरित परिणाम होईल असे दिसत आहे. या गोचरामुळे कर्क राशीच्या जातकांना आर्थिकदृष्ट्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सगळंच नकारात्मक होईल असे नाही. काही सकारात्मक गोष्टीही दिसतील. या गोचरामुळे तुमच्यासाठी नात्यांमध्ये काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. इतकेच नाही तर काही लोकांचे लग्न पक्के होणार आहे. याशिवाय तुमच्या मुलांशी तुमचे संबंधही चांगले राहतील.

मीन राशीच्या जातकांना मिळेल चांगल्या सुविधा, सुखसोई

शुक्राच्या गोचराचा मीन राशीच्या जातकांना चांगलाच फायदा होणार आहे. हे गोचर  मीन राशीच्या जातकांसाठी चांगल्या सुविधा घेऊन येणार आहे. मी राशीच्या जातकांना शारीरिक सुखसोयी मिळणार आहेत. नोकरी शोधणाऱ्यांना काही अडचणी येतील, पण त्यानंतर त्या समस्या आपोआप दूर देखील होणार आहेत. आपण नूतनीकरण किंवा नवीन घर खरेदी करण्याचा विचार कराल. एकंदरीत पाहता तुमचा वेळ चांगला जाणार आहे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner