मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Shukra Gochar : शुक्र मिथुन राशीत करणार संक्रमण! 'या' ५ राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार

Shukra Gochar : शुक्र मिथुन राशीत करणार संक्रमण! 'या' ५ राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार

Jun 12, 2024 01:04 PM IST

Venus Transit In Gemini June 2024 : शुक्राला बुद्धी, कला,सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे शुक्र ज्या राशीत असेल त्या राशीला तर फायदा होतोच शिवाय इतरही राशींवर सकारात्मक प्रभाव पडतो.

शुक्र गोचर, शुक्राचे राशीपरिवर्तन, शुक्र ग्रहाचे संक्रमण
शुक्र गोचर, शुक्राचे राशीपरिवर्तन, शुक्र ग्रहाचे संक्रमण

जोतिष शास्त्रानुसार ग्रह-नक्षत्र एका ठराविक कालावधीनंतर राशीपरिवर्तन करत असतात. ग्रहांच्या या स्थान बदलाने विविध बदल घडून येतात. आज शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राला बुद्धी, कला,सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे शुक्र ज्या राशीत असेल त्या राशीला तर फायदा होतोच शिवाय इतरही राशींवर सकारत्मक प्रभाव पडतो. शुक्राच्या मिथुन राशीत गोचर करण्याने असाच फायदेशीर परिणाम ५ राशींवर झालेला दिसून येणार आहे.

जोतिष अभयसानुसार आज सायंकाळी ६ वाजून मिनिटांनी शुक्र राशीपरिवर्तन करणार आहे. शुक्र आज आपली राशी बदलत वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. आज १२ जून पासून येत्या ७ जून २०२४ पर्यंत शुक्र मिथुन राशीत विराजमान असणार आहे. शुक्राच्या मिथुन राशीत आगमनाने काही राशींचे भाग्य उजळणार आहे. पाहूया या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.

मेष

शुक्र ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केल्याने मेष राशीचे भाग्य मजबूत होणार आहे. नोकरीत-कार्यक्षेत्रात प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. याकाळात हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होईल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. मात्र काही ठिकाणी तुम्हाला संयम ठेऊन वर्तवणूक करावी लागेल. त्यामुळे मिळालेल्या संधींचे सोने करण्यात यशस्वी व्हाल. तसेच याकाळात आरोग्यसुद्धा उत्तम राहणार आहे.

वृषभ

यंदाचे शुक्र गोचर वृषभ राशीसाठी अत्यंत फायदेशीर असणार आहे. तुम्हाला आर्थिक स्थिती मजबूत करण्याची संधी मिळेल. कमाईचे विविध मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुमचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा दुपट्टीने वाढेल. नवीन घर किंवा वाहन घेण्याची इच्छा असेल, तर याकाळात ती सत्यात उतरू शकते. तसेच कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक केल्यास तुम्हाला आर्थिक लाभच होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्यांना चांगला नफा होईल. वैवाहिक आयुष्य अत्यंत सुखी राहील. शिवाय लव्ह लाईफमध्ये जोडीदारासोबत रोमँटिक मूड असणार आहे.

कन्या

शुक्राच्या राशीपरिवर्तनाचा शुभ प्रभाव कन्या राशीवरसुद्धा पडणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये वेगाने प्रगती झालेली दिसून येईल. कार्यक्षेत्रात तुमचा नावलौकिक वाढेल. यातून तुम्हाला पैसा आणि प्रतिष्ठा दोन्ही प्राप्त होतील. त्यामुळे मानसिक समाधान लाभणार आहे. शुक्र ग्रह प्रेमाचेसुद्धा प्रतीक असल्याने तुमची लव्ह लाईफ आणखी बहरणार आहे. वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी येईल. पतीपत्नींमध्ये प्रेम आणि आदर वाढेल. घरातील वातावरणसुद्धा खेळीमेळीचे असणार आहे.

धनु

धनु राशीच्या लोकांनासुद्धा शुक्राच्या राशीपरिवर्तनाचा फायदा होणार आहे. नोकरदारवर्गात कमी वेळेत जास्त प्रगती झालेली दिसून येणार आहे. तुम्हाला वरिष्ठांची मर्जी प्राप्त होईल. त्यामुळे येत्या काळात पगारवाढ किंवा बढती मिळण्याचे योग आहेत. मिळकतीचे नवे मार्ग तुम्हाला अवगत होतील. त्यामुळे आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक भक्कम होणार आहे. जे लोक भागीदारीत व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा योग अगदी वरदान ठरणार आहे. अशा लोकांना प्रचंड आर्थिक लाभ झालेला दिसून येईल. शिवाय व्यवसायसुद्धा विस्तारेल. मात्र कामात निष्काळजीपणा करु नका.

मीन

शुक्राच्या संक्रमणाने मीन राशीवरसुद्धा शुभ प्रभाव पडणार आहे. तुमच्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. याकाळात तुम्ही अत्यंत शुभ वास्तू किंवा जमीन खरेदी करु शकता. ही आर्थिक गुंतवणूक तुम्हाला भविष्यात प्रचंड लाभ देणारी ठरेल. व्यवसायात तुम्हाला पूर्ण लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. त्यामुळे तुमच्या व्यवस्याचा विस्तार होईल. याकाळात तुम्हाला हातात घेतलेल्या प्रत्येक कामात मनासारखे यश मिळेल.

WhatsApp channel
विभाग