Shukra Gochar and malavya rajyog : ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळं वेगवेगळे योग तयार होत असतात. ज्योतिषशास्त्रात या योगांना विशेष महत्त्व असत. या शुभ-अशुभ योगांचे राशींवर चांगले-वाईट परिणाम होत असतात. त्यामुळं सर्वांचं याकडं लक्ष असतं.
मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वितीयेला म्हणजेच, बुधवार २९ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री १० वाजून २५ मिनिटांनी शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाच्या कन्या राशीतून शुक्र स्वराशीत विराजमान होत आहे. कन्या राशीवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकल्यानंतर आता तो तूळ राशीत पोहोचला आहे. शुक्रवार, २४ डिसेंबर २०२३ पर्यंत शुक्र स्वराशीत वास्तव्यास असेल.
शुक्र जेव्हा वृषभ, तूळ किंवा मीन राशीत पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या घरात असतो. तेव्हा मालव्य योग जुळून येतो. असाच योग शुक्राच्या तूळ राशीतील वास्तव्यानंतर योणार आहे. या योगाचा काही राशींच्या जातकांवर शुभ प्रभाव पडणार आहे.
धनेश आणि सप्तमेश सातव्या घरात आहेत. कुटुंबात मन मरेल. कामात उत्साह वाटेल. भागादारीत व्यवसाय करत असाल तर प्रगतीचा योग आहे. वाणीशी संबंधित व्यवसाय उदा. सेल्स मार्केटिंग किंवा शिक्षकांना खास लाभ होईल. कौटुंबिक कामात प्रगती होईल. आनंद मिळेल. वैवाहिक जीवन सुखाचं होईल. प्रेम संबंधात सुधारणा होईल. नोकरीतील तणाव संपेल. महिलांचा आदर करा.
उत्पन्न वाढेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. मनोधैर्य उंचावलेलं असेल. नात्यातील लोकांमुळे मन दु:खी राहील. पूर्ण क्षमतेनं निर्णय घ्याल. प्रेमप्रकरणासाठी अनुकूल काळ असेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. जमीन-जुमला आणि कायदेशीर प्रकरणांमुळं ताणतणाव जाणवण्याची शक्यता आहे.
उपाय - मूळ कुंडलीनुसार शुक्र ग्रहाला बळ द्या.
बुद्धीकौशल्याचा वापर करून नव्या कामाला सुरुवात कराल. विद्यार्थी आणि शिक्षक वर्गासाठी काळ अत्यंत चांगला आहे. चैनीच्या खर्चात वाढ होईल. मुलांच्या भवितव्याची चिंता कमी होईल. उत्तम प्रगती होईल. कलेच्या क्षेत्रातील लोकांना नवीन संधी मिळतील.
उपाय - गायीची नियमित सेवा करा.
आनंदी राहाल. सुखसाधनांमध्ये वाढ होईल. आईची तब्येत ठणठणीत राहील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. स्थावर व जंगम मालमत्तेशी संबंधित काही व्यवहार केल्यास लाभ होईल. व्यवसायात वृद्धीचा योग आहे. जमिनीशी संबंधित व्यवसायात यश मिळेल. छातीत दुखण्याचा त्रास होऊ शकतो.
उपाय - महिलांचा, विशेषत: विधवांचा आदर करा.
धाडस वाढेल. नोकरी करत असाल तर प्रमोशन आणि बदलीची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी अनुकूल दिवस आहे. सामाजिक पाठिंबा वाढण्याची शक्यता आहे. कष्टाचं योग्य ते फळ मिळेल. कुटुंबीय आणि मित्रमंडळींची साथ आणि प्रेम मिळेल. सुखसाधनांची कमतरता भासणार नाही. नोकरीच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल. कलेच्या क्षेत्रातील लोकांसाठी चांगला काळ असेल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)