Shukra Gochar: धन आणि संपत्ती देणारा शुक्र काही दिवसांतच शनीच्या राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या गोचरामुळे काही राशींना नफा होणार आहे. तर काही राशींना तोट्यालाही सामोरे जावे लागेल. पंचांगानुसार शुक्र, ०२ डिसेंबर रोजी आपली पुढची वाटचाल करणार आहे. शुक्र शनीच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र २७ डिसेंबरपर्यंत मकर राशीत भ्रमण करेल. शुक्राचे शनीच्या राशीत गोचर झाल्यामुळे कोणत्या राशींसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे हे जाणून घेऊया.
शुक्राचे शनीच्या राशीत गोचर झाल्यामुळे मकर, कन्या आणि कुंभ राशींच्या जातकांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. या गोचरामुळे या तीन राशींच्या जातकांना व्यवसायात मोठा लाभ, आर्थिक नफा आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदे मिळत राहणार आहेत.
मकर राशीच्या जातकांसाठी शुक्राचे संक्रमण शुभ मानले जाते. अशा स्थितीमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप रस वाटेल. व्यवसायिकांसाठी देखील शुक्राचे हे गोचर लाभदायक ठरणार आहे. चांगल्या योजनांनी व्यवसायात नफा कमावू शकता. आरोग्याची काळजी घ्या आणि जंक फूड खाणे टाळा. दरम्यानच्या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आईची काळजी घ्या.
कन्या राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे संक्रमण अत्यंत लाभदायक मानले जाते. शुक्राचे शनीच्या राशीत गोचर झाल्यामुळे तुम्हाला व्यवसायात याचा खूप मोठा फायदा मिळणार आहे. येणाऱ्या काळात तुम्ही केलेली प्रत्येक रणनीतीला यश मिळत जाणार आहे. कामाच्या अनुषंगाने प्रवास करावा लागू शकतो. शुक्राच्या या गोचर स्थितीमुळे तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. मात्र तुम्ही निरोगी आहार घेत रहा. तुमच्या व्यवसायात रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.
शुक्राचे राशीपरिवर्तन कुंभ राशीच्या जातकांसाठी फायदेशीर ठरू शकते. शुक्राचे शनीच्या राशीत गोचर झाल्यामुळे तुम्हाला भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी दूर होऊ लागतील. त्याच प्रमाणे व्यवसायात पैशांशी संबंधित तणावाची परिस्थिती संपुष्टात येईल. त्याचबरोबर समजूतदारपणाने तुमची कामगिरीही सुधारू शकाल. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ द्या.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.