ग्रह-नक्षत्राचा राशींवर परिणाम होतो. प्रत्येक ग्रह आपल्या कालगणनेनुसार राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात. शुक्र ग्रहाने नोव्हेंबर महिन्यात ७ तारखेला पहाटे ३ वाजून २१ मिनिटांनी धनु राशीत प्रवेश केला होता. यानंतर शुक्र ग्रह २०२४ संपण्यापूर्वी २ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी कुंभ राशीत प्रवेश करेल. २ आणि २८ डिसेंबरला शुक्राचे संक्रमण कोणत्या राशींवर फायदेशीर ठरेल हे जाणून घेऊया.
डिसेंबरमध्ये शुक्र ग्रहाने कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. कुंभ राशीत प्रवेश केल्याने शुक्र शनी देवांशी युती करेल. २८ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजून ४८ मिनिटांनी शुक्र शनीच्या राशीत भ्रमण करेल. शुक्राचे कुंभ राशीत होणारे संक्रमण काही राशींवर सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक परिणाम करेल. शुक्राचे संक्रमण काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे. शुक्राचे कुंभ राशीत संक्रमण झाल्यामुळे कोणत्या राशींचे नशीब फळणार आहे ते जाणून घेऊया.
कुंभ राशीचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात सुरू असलेले मतभेद दूर होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि पैसा हाती येईल. प्रवास करण्याचीही शक्यता आहे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण शुभ सिद्ध होऊ शकते. तुमचा मान-सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी ही तुम्ही कौतुकाचा विषय बनू शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगला मानला जातो. या काळात तुमचे मन अभ्यासात गुंतलेले राहील. पण आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण खूप फायदेशीर ठरू शकते. करिअरमध्ये बढती मिळवण्यासाठी तुम्हाला अनेक महत्त्वाची कामे मिळू शकतात, जी तुम्हाला वेळेत पूर्ण करावी लागतील. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखाद्या विशेष व्यक्तीची एन्ट्री होऊ शकते. या काळात समाजात तुमचा सन्मान वाढेल आणि तुम्ही आत्मविश्वासी व्हाल तसेच प्रत्येक काम जबाबदारीने पूर्ण कराल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)