मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Shukra Gochar: ५ दिवसांनी शुक्र बदलणार स्थान; ‘या’ राशी होणार मालामाल! पाहा तुमची रास यात आहे का...

Shukra Gochar: ५ दिवसांनी शुक्र बदलणार स्थान; ‘या’ राशी होणार मालामाल! पाहा तुमची रास यात आहे का...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 26, 2024 01:30 PM IST

Shukra Gochar April 2024: ३१ मार्चला शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर, २४ एप्रिलपर्यंत शुक्र मीन राशीतच राहणार आहे.

५ दिवसांनी शुक्र बदलणार स्थान; ‘या’ राशी होणार मालामाल! पाहा तुमची रास यात आहे का...
५ दिवसांनी शुक्र बदलणार स्थान; ‘या’ राशी होणार मालामाल! पाहा तुमची रास यात आहे का...

Shukra Gochar April 2024: शुक्राच्या हालचालींचा सर्व राशींवर मोठा परिणाम होतो. सध्या शुक्र हा शनीच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान झाला आहे. शुक्राने ७ मार्चला कुंभ राशीत प्रवेश केला होता. आता ३१ मार्चला शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर, २४ एप्रिलपर्यंत शुक्र मीन राशीतच राहणार आहे. शुक्राचे संक्रमण होताच मीन राशीत शुक्र आणि राहूचा संयोग होणार आहे. शुक्राचे हे संक्रमण काही राशींचे भाग्य उजळवणार आहे. चला जाणून घेऊया, शुक्र संक्रमणामुळे कोणत्या राशींना जबरदस्त फायदा होणार आहे.

वृषभ

शुक्राची बदलती चाल आणि स्थान वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी चांगला सौदा मिळू शकेल, जो भविष्यात फायदेशीर देखील सिद्ध होईल. या काळात तुम्ही एखाद्या सहलीलाही जाऊ शकता. तुम्हाला आर्थिक लाभ होईल. वैवाहिक जीवनात गोडवा कायम राहील. तुम्हाला उपासनेत खूप आनंद आणि समाधान मिळेल.

Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : निर्णय घेण्यास उशीर करू नका, संधी निघून जाईल! वाचा राशीभविष्य

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण लाभदायक ठरणार आहे. आजवर तुम्ही करत आलेल्या तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे. जीवनातील सुख-शांतीमुळे घरातील वातावरण देखील प्रसन्न राहील. या काळात तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत अथवा प्रिय व्यक्तीसोबत डेटवरही जाऊ शकता. तुमची कमाई वाढवण्यासाठी तुम्हाला नवीन स्रोत सापडतील. नवीन नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे.

कुंभ

शुक्राच्या राशीतील बदल कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ मानला जातो. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील. जीवनात रोमांस आणि आकर्षण राहील. या काळात एखाद्या छोट्या सहलीलाही जाण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन कामे मिळू शकतात. तुम्ही व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर व्हाल. हा काळ तुमच्या आयुष्यात शांती आणि समाधान घेऊन येईल.

WhatsApp channel