Venus Transit In Shatabhisha Nakshatra In Marathi : प्रत्येक ग्रह आपल्या कालगणनेनुसार गोचर करतो. नवीन वर्षातही आता प्रत्येक ग्रहाचे हे गोचर होईल आणि त्याचा सर्व १२ राशींवर परिणाम होईल. नवग्रह हे राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात. ग्रहांचा बदल काही राशीच्या लोकांसाठी शुभ तर काही राशीच्या लोकांसाठी अशुभ परिणामी ठरतो.
ज्योतिषशास्त्रात शुक्र हा धन, वैभव आणि ऐशोआरामाचा कारक ग्रह मानला जातो. शुक्र राशी बदलण्याबरोबरच एका विशिष्ट वेळी नक्षत्रही बदलतो. शुक्राच्या हालचालीतील बदलाचा परिणाम मेष ते मीन राशीवर होतो. ज्योतिषीय गणनेनुसार शुक्र ग्रह ४ जानेवारी २०२५ रोजी शतभिषा नक्षत्रात भ्रमण करेल. शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहू आहे. शुक्राचे नक्षत्र परिवर्तन काही राशींच्या जीवनात चांगला बदल घडवून आणेल. या काळात या राशींना आर्थिक प्रगतीबरोबरच व्यावसायिक प्रगतीही मिळू शकते. शुक्राचे नक्षत्र केव्हा होईल आणि शुक्राचे राहूच्या नक्षत्रात होणारे भ्रमण कोण-कोणत्या राशींसाठी लाभदायक परिणाम देणारे ठरेल ते जाणून घ्या.
पंचांगानुसार शुक्र ग्रह ४ जानेवारी २०२५ रोजी, शनिवार पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांनी शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल आणि १७ जानेवारी २०२५ पर्यंत या नक्षत्रात गोचर करेल. यानंतर शुक्रवार, १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल.
वृषभ : शुक्राचे नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील. शुक्राच्या प्रभावामुळे आर्थिक प्रगती होऊ शकते. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात यश मिळण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनात सुधारणा होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतील. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो.
तूळ : तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्र नक्षत्र परिवर्तन शुभ राहील. या काळात तुम्ही आलिशान जीवन जगू शकाल. भौतिक संपत्तीत वाढ होईल. व्यापाऱ्यांना व्यापार विस्ताराची संधी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. आकस्मिक लाभही होऊ शकतो.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्र नक्षत्र परिवर्तन फायदेशीर ठरणार आहे. शुक्राच्या प्रभावाने तुमची आर्थिक, शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत होईल. प्रिय जनांचे सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवू शकाल. नोकरी करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. प्रेम जीवनामध्ये सुधारणा होईल.
संबंधित बातम्या