Shukra Gochar 2025 In Marathi : जर तुमच्या कुंडलीत शुक्र चांगल्या स्थानी विराजमान असेल तर तुम्हाला फायदा होतो. शुक्र हा धन, वैवाहिक सुख, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य, रोमान्स, फॅशन-डिझायनिंग इत्यादींचा कारक ग्रह मानला जातो. शुक्र तुळ आणि वृषभ राशीचा स्वामी आहे. नवीन वर्षात शुक्र एकदा नव्हे तर ११ वेळा भ्रमण करेल. शुक्राचे हे संक्रमण प्रत्येक वेळी खूप खास असेल.
सर्वप्रथम वर्ष २०२५ च्या पहिल्या महिन्यात शुक्र शनीच्या कुंभ राशीत असेल. बुधवार, १ जानेवारी २०२५ ते बुधवार २९ जानेवारी २०२५ या कालावधीत शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल.
बुधवार २९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १२ वाजून २० मिनिटापासून ते शनिवार ३१ मे २०२५ रोजी पहाटे ३ वाजून ८ मिनिटापर्यंत शुक्र मीन या उच्च राशीत प्रवेश करेल. त्यानंतर मेष राशीत परिवर्तन करेल.
वर्ष २०२५ मध्ये शुक्र अनेक राशींवर प्रभाव टाकेल. शुक्र, मीन राशीच्या लोकांना लाभदायक ठरत आहे. शुक्र २०२५ मध्ये बराच काळ या राशीत राहील आणि या राशीच्या लोकांवर आशीर्वादाचा वर्षाव करेल. याशिवाय मिथुन राशीसाठी शुक्र करिअरमध्ये लाभ मिळवून देईल. जाणून घ्या २०२५ मध्ये प्रत्येक राशीत शुक्र कधी विराजमान होणार ते.
शनिवार, ३१ मे २०२५ रोजी दुपारी ३ वाजून ८ मिनिटांपासून शनिवार, २८ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजून ३४ मिनिटांपर्यंत मेष राशीत शुक्राचे संक्रमण राहील. त्यानंतर शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल.
शनिवार, २८ जून २०२५ रोजी पहाटे २ वाजून ३४ मिनिटांपासून गुरुवार, २४ जुलै २०२५ रोजी पहाटे ३ वाजून १८ मिनिटांपर्यंत शुक्राचे वृषभ राशीत गोचर होईल. त्यानंतर शुक्र मिथुन राशीत प्रवेश करेल.
गुरुवार, २४ जुलै २०२५ रोजी पहाटे ३ वाजून १८ मिनिटांपासून मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत शुक्राचे मिथुन राशीत गोचर होईल. त्यानंतर कर्क राशीत प्रवेश करेल.
मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपासून शनिवार, १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांपर्यंत शुक्राचे कर्क राशीत संक्रमण होईल. त्यानंतर सिंह राशीत प्रवेश करेल.
शुक्र शनिवार १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांपासून ते ८ ऑक्टोबर २०२५ रोजी बुधवारी रात्री ७ वाजून १३ मिनिटांपर्यंत शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल. त्यानंतर कन्या राशीत प्रवेश करेल.
बुधवारी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजून १३ मिनिटांपासून शनिवार, १ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजून ४ मिनिटांपर्यंत शुक्राचे कन्या राशीत गोचर होईल. त्यानंतर तूळ राशीत प्रवेश करेल.
शनिवारी १ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ४ वाजून ४ मिनिटांपासून ते बुधवार २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजून ५५ मिनिटांपर्यंत तूळ राशीत शुक्राचे संक्रमण होईल. त्यानंतर वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
बुधवार २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजून ५५ मिनिटांपासून ते २० डिसेंबर रोजी सूर्योदयापूर्वी सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपर्यंत शुक्राचे वृश्चिक राशीत संक्रमण होईल. त्यानंतर शुक्र धनु राशीच प्रवेश करेल.
शनिवारी २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांनी शुक्र ग्रह धनु राशीत प्रवेश करेल, जो वर्षाच्या अखेरपर्यंत याच राशीत राहील.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या