मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Shukra Gochar : शुक्र करणार कन्या राशीत गोचर! 'या' राशींची होणार प्रगती, मिळणार प्रचंड आर्थिक लाभ

Shukra Gochar : शुक्र करणार कन्या राशीत गोचर! 'या' राशींची होणार प्रगती, मिळणार प्रचंड आर्थिक लाभ

Jul 09, 2024 11:22 AM IST

Shukra Gochar 2024 : येत्या ऑगस्ट महिन्यात शुक्र राशी परिवर्तन करणार आहे. शुक्र राशीपरिवर्तन करत कन्या राशीत गोचर करेल.

शुक्र गोचर २०२४
शुक्र गोचर २०२४

ज्योतिष शास्त्रात ग्रह अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. शास्त्रानुसार ग्रह एका ठराविक काळात आपले स्थान बदलत असतात. याकाळात ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. या गोचरमधून विविध शुभ-अशुभ योगाची निर्मिती होते. या योगांचा पूर्ण प्रभाव राशीचक्रातील राशींवर पडत असतो. वास्तविक याच प्रभावातून राशींचे भविष्य ठरत असते. ग्रह गोचरमधून निर्माण झालेले योग काही राशींसाठी अशुभ असतात तर काही राशींसाठी अत्यंत शुभ असतात. सध्या जुलै महिना प्रारंभ झाला आहे. या महिन्यात विविध योग निर्माण होत आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे एक वेगळे महत्व असते. त्यानुसार शुक्राला दैत्यांचा गुरु म्हटले जाते. शिवाय शुक्राला धन,संपत्ती, ऐश्वर्य आणि सौंदर्य यांचा कारक मानले जाते. त्यानुसार शुक्र ज्या राशीवर आपली कृपादृष्टी टाकेल त्या राशींना या गुणधर्मांचा लाभ मिळतो. येत्या ऑगस्ट महिन्यात शुक्र राशी परिवर्तन करणार आहे. शुक्र राशीपरिवर्तन करत कन्या राशीत गोचर करेल. कन्या राशीचा स्वामी ग्रह ग्रहांचा राजकुमार बुध आहे. अशात शुक्राच्या या राशीत प्रवेशाने अनेक शुभ योगांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे हे शुक्र गोचर काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. पाहूया त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

कन्या

शुक्राच्या गोचरचा विशेष लाभ कन्या राशीला मिळणार आहे. कारण याच राशीत सूर्य गोचर करणार आहे. याकाळात तुम्ही मनात आखलेल्या सर्व योजना पूर्ण होतील. शिवाय तुमच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होईल. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. विविध मार्गाने आर्थिक लाभ होत राहतील. त्यामुळे आर्थिक स्थिती भक्कम होईल. महत्वाच्या कामात कुटुंबाची पूर्ण साथ मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. वैवाहिक आयुष्य सुखी राहील. भागीदारीत व्यवसाय असणाऱ्यांना या काळात विशेष फायदा होईल.

धनु

शुक्र गोचरचा फायदा धनु राशीच्या लोकांनासुद्धा मिळणार आहे. शुक्र या राशीच्या कर्म घरात भ्रमण करणार आहे. याकाळात तुम्हाला उद्योग-व्यापारात चांगला नफा होईल. कार्यक्षेत्रात चांगल्या संधी पदरात पडतील. करिअरमध्ये वेगाने प्रगती होईल. शिवाय याकाळात काही नवीन नाती निर्माण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळेल. व्यापाऱ्यांना व्यापाराचा विस्तार करण्याची संधी मिळेल. त्यातून धनलाभ होईल. तसेच काहींना विदेशात नोकरीचा योग जुळून येत आहे. याकाळात वडिलांसोबतचे मतभेद दूर होऊन तुमचे नाते अधिक घट्ट होईल. घरातील वातावरण आनंदी आणि खेळीमेळीचे राहील.

सिंह

शुक्र गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. हे गोचर सिंह राशीच्या इन्कम आणि लाभ घरात होत आहे. त्यामुळे याकाळात तुमच्या पगारात वाढ होईल. आर्थिक आवक वाढल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. विविध गोष्टींमधून लाभ मिळतील. मनासारख्या गोष्टी घडत असलयाने मन उत्साही राहील. या गोचरमध्ये स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यावर भर द्याल. शिवाय त्यादृष्टीने काही महत्वाचे आणि सकारात्मक निर्णय ठामपणे घ्याल. आयात-निर्यातीच्या व्यवसायात मोठा आर्थिक नफा मिळेल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अगदी उत्तम आहे.

WhatsApp channel