ग्रह-नक्षत्र या गोष्टी प्रामुख्याने खगोलशास्त्राचा अविभाज्य भाग आहेत. ग्रहांच्या हालचाली या खगोलशास्त्राच्या विशेष घडामोडी आहेत. मात्र वैदिक ज्योतिष शास्त्रातसुद्धा ग्रह-नक्षत्रांना अनन्यसाधारण महत्व आहे. यामध्ये ग्रहांच्या हालचालींचा थेट संबंध मानवी आयुष्याशी जोडला जातो. ग्रह एका ठराविक वेळेत स्थान बदलत असतात. अशावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. ग्रहांच्या या गोचरमधून विविध योगांची निर्मिती होते. हे योग राशीचक्रातील राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव टाकत असतात. येत्या काळात शुक्र गोचर करणार आहे.
नवग्रहांमध्ये शुक्र ग्रहाला विशेष महत्व आहे. शुक्र ग्रहाला धनधान्य, संपत्ती, ऐश्वर्य, सौंदर्य यांचा कारक मानले जाते. शुक्राच्या या गुणधर्मांचा स्वभाव त्याच्या मूळ राशींमध्ये दिसून येतो. दरम्यान येत्या सप्टेंबरमध्ये शुक्र आपली मूळ राशी असणाऱ्या तूळ राशीत गोचर करणार आहे. शुक्राचे हे गोचर काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या राशींच्या आर्थिक, व्यवसायिक आणि वैवाहिक आयुष्यात प्रचंड यश आणि समाधान लाभणार आहे. या नशीबवान राशी कोणत्या आहेत, ते आपण जाणून घेऊया.
शुक्र तूळ राशीतच प्रवेश करत असल्याने या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. याकाळात तुमच्या व्यक्तिमत्वात प्रचंड सकारात्मक बदल होईल. तुमच्या वाणीवर लोक प्रभावित होतील. समाजात तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. शिवाय याकाळात अनेक प्रसिद्ध लोकांच्या गाठीभेटी होतील. त्याचासुद्धा तुम्हाला लाभ मिळेल. नोकरीत नव्या संधी पदरात पडतील. वेगाने प्रगती व्हायला मदत होईल. उद्योग-व्यवसायात विविध डील फायनल कराल. विवाहित लोकांच्या आयुष्यात गृहसौख्य लाभेल. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल.
शुक्र गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. याकाळात तुमची बौद्धिक क्षमता प्रचंड वाढेल. कार्यक्षेत्रात त्याचा चांगला वापर कराल. वरिष्ठ तुमच्या कार्यावर प्रभावित होतील. स्वतःच्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित कराल. त्यामुळे साहजिकच यश पदरी पडेल. उद्योग-व्यवसायात मोठा आर्थिक नफा होईल. कामानिमित्त विदेश यात्रा घडून येईल. परदेशात व्यवसाय विस्तारण्याची चांगली संधी मिळेल. धन कमवण्याचे विविध मार्ग खुले होतील. त्यामुळे आर्थिक स्थिती भक्कम होईल.
शुक्राच्या मूळ राशीत प्रवेशाने कर्क राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. याकाळात तुम्हाला विविध मार्गाने धनलाभ होतील. राहणीमानात सुधारणा होईल. घरात भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून मोठी जबाबदारी मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. घर किंवा वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होईल. व्यवसाय-उद्योगात चांगला आर्थिक फायदा मिळेल. भागीदारीच्या व्यवसायात यश मिळेल. कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक केल्यास लाभदायक ठरणार आहे.आईवडिलांसोबत नातेसंबंध सुधारतील. मतभेद दूर होतील. घरात सुखसमृद्धी नांदेल.
संबंधित बातम्या