मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Shukra Gochar : जोडीदारासोबतचे मतभेद संपणार, प्रेम जीवन बहरणार! शुक्र गोचर या राशींना ठरणार वरदान

Shukra Gochar : जोडीदारासोबतचे मतभेद संपणार, प्रेम जीवन बहरणार! शुक्र गोचर या राशींना ठरणार वरदान

Jul 06, 2024 11:23 AM IST

Shukra Gochar 2024 : ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन फक्त भविष्यच नव्हे तर तुमचा स्वभाव, आवडी-निवडी, प्रेम जीवन अशा विविध गोष्टींची माहिती मिळवता येते.

शुक्र संक्रमण २०२४
शुक्र संक्रमण २०२४

हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला विशेष महत्व आहे. दैनंदिन आयुष्यापासून ते शुभ कार्यांपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये ज्योतिषशास्त्र महत्वाची भूमिका बजावत असते. या शास्त्राद्वारे अनेक समस्यांवर उपाय सापडतात. हिंदू धर्मात कोणतेही काम करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला अवश्य घेतला जातो. शिवाय ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून तुमच्या कुंडली आणि ग्रहस्थितीबद्दलदेखील चांगली माहिती मिळते. ज्यावरून तुमच्या भविष्याची गणना केली जाते.

ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन फक्त भविष्यच नव्हे तर तुमचा स्वभाव, आवडी-निवडी, लव्ह लाईफ अशा विविध गोष्टींची माहिती मिळवता येते. ग्रहसुद्धा तुमच्या लव्ह लाईफवर आणि वैवाहिक आयुष्यावर मोठा प्रभाव टाकत असतात. लवकरच प्रेम आणि सौंदर्य दाता शुक्र गोचर करणार आहे. याचा काही राशींच्या लव्ह लाईफवर अत्यंत शुभ प्रभाव पडणार आहे.

शुक्र गोचर

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र अतिशय शुभ प्रभाव देणाऱ्या ग्रहांपैकी एक आहे. शुक्राला बुद्धी, धन, संपत्ती, सौंदर्य, प्रेम आणि विलासिनता यांचा कारक मानले जाते. त्यामुळेच शुक्र गोचर अत्यंत महत्वाचे समजले जाते. शुक्राच्या राशी परिवर्तनातून प्रचंड शुभ लाभ काही राशींना मिळतात. उद्या अर्थातच ७ जुलै २०२४ रोजी पहाटे ४ वाजून ३१ मिनिटांनी शुक्र मिथुन राशीतून निघून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र या राशीत तब्बल २४ दिवस विराजमान असणार आहे. त्यानंतर शुक्र ९ जुलैला पुष्य, २० जुलैला आश्लेषा आणि ३१ जुलैला मघा नक्षत्रात प्रवेश करेल. ७ तारखेला होणारे शुक्र गोचर काही राशींच्या लव्ह लाईफवर आणि वैवाहिक आयुष्यावर अत्यंत सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. पाहूया या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.

मकर

शुक्र गोचरचा फलदायी लाभ मकर राशीच्या लोकांना मिळणार आहे. खासकरून तुमच्या लव्ह लाईफमध्ये फायदा होणार आहे. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय सुखद आहे. तुम्हाला जोडीदाराकडून प्रचंड प्रेम आणि आदर मिळेल. मनमोकळा संवाद झाल्याने एकमेकांबाबत अधिक जाणून घेण्याची संधी मिळेल. त्यातून तुमचे नाते अधिक मजबूत होईल. शिवाय काहींचे जोडीदारासोबत असलेले मतभेद दूर होतील. विशेष म्हणजे ब्रेकअप झालेल्या कपल्सचा पॅचअप होण्याची दाट शक्यता आहे. नवविवाहित दाम्पत्याच्या आयुष्यात सुखसमृद्धी येईल. त्यासोबतच लग्नासाठी इच्छुक असणाऱ्यांना विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. शुक्र गोचरच्या काळात आवडत्या व्यक्तीजवळ भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. एकंदरीत या राशीच्या लोकांची लव्ह लाईफ बहरणार आहे.

मीन

मकरप्रमाणे मीन राशीच्या लोकांना शुक्र गोचर अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लव्ह लाईफमध्येसुद्धा सकारात्मक परिणाम पाहायला मिळणार आहेत. या राशीवर शुक्र ग्रहाची विशेष कृपा पाहायला मिळते. शुक्र गोचरच्या काळात तुम्हाला जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. याकाळात प्रेमप्रकरण लग्नापर्यंत पोहोचविण्याची चर्चा घडून येईल. जोडीदारासोबत नातेसंबंध बिघडले असतील तर, याकाळात वादविवाद संपुष्ठात येतील. नात्याची नवी सुरुवात करण्यासाठी हा काळ अतिशय शुभ आहे. विवाहित लोकांच्या वैवाहिक आयुष्यात प्रेम आणि आदर वाढेल. जोडीदाराला रोमँटिक डेटवर नेण्याची योजना आखाल.

WhatsApp channel