गुरु आणि शुक्राची युती जोतिष शास्त्रानुसार अतिशय खास समजली जाते. अवघ्या काही दिवसांपूर्वी शुक्र ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला होता. परंतु तत्पूर्वी आधीच गुरु त्याठिकाणी विराजमान होता. अशातच वृषभ राशीत गुरु आणि शुक्राची युती जुळून आली होती. जी अद्यापही कायम आहे. शुक्र जून महिन्यात राशीबदल करणार आहे. त्यामुळे सध्या काही राशींना शुक्र-गुरु युतीचा अफाट फायदा होणार आहे. शुक्र ग्रहाला धन, वैभव, सौंदर्य, संपत्तीचा देवता म्हटले जाते. त्यामुळे शुक्राचा प्रभाव असणाऱ्या राशी नेहमीच फायद्यात असतात. पाहूया यंदा कोणत्या राशींना शुक्र ग्रहाच्या हालचालींचा फायदा होणार आहे.
गुरु आणि शुक्राची युती झाल्याने मेष राशी अतिशय फायद्यात आहे. शुक्राचा शुभ प्रभाव मेष राशीवर सतत पडत आहे. याकाळात मेष राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मी प्रचंड प्रभावी असणार आहे. अशातच या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याचे योग जुळून येतील. अनपेक्षित मार्गाने धनलाभ झाल्याने मन आनंदी राहील. मात्र अनावश्यक खर्चावर निंयत्रण ठेवावे लागेल. अथवा हातात आलेला पैसा विनाकारण खर्च होऊन जाईल. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळण्याचा योग येईल. शिवाय जुन्या आजारांपासून सुटका मिळेल. आरोग्य अगदी उत्तम राहील. घरातील वातावरणसुद्धा आनंदी राहणार आहे.
मेष राशीप्रमाणेच गुरु आणि शुक्राची युती कर्क राशीसाठीसुद्धा फायदेशीर ठरणार आहे. नोकरदारवर्गाला करिअरच्या दृष्टिकोनातून हा काळ अतिशय शुभ असणार आहे. प्रगतीच्या अनेक नव्या संधी हातात येतील. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे याकाळात अचानक परत मिळू शकतात. अचानक पैसे मिळाल्याने आनंद द्विगुणित होईल. लव लाईफबाबत सांगायचं तर, जोडीदारासोबत संबंध सुधारतील. शिवाय सिंगल लोकांना लवकरच मनासारखा जोडीदार मिळू शकतो. लग्नासाठी इच्छुक असणाऱ्यांना या काळात विवाह जुळून येतील. त्यामुळे कुटुंबात आनंदमय वातावरण असेल. नव्या व्यक्तीच्या प्रवेशाने घर आणि तुमचे आयुष्य उजळून निघेल.
गुरु-शुक्र युतीचा सकारात्मक प्रभाव सिंह राशीवरसुद्धा पडणार आहे. शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे सिंह राशी फायद्यात असणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरीत बढतीचा आणि पगारवाढीचा योग जुळून येत आहे. हातात घेतलेल्या कामात पटकन यश मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे बघता- बघता पूर्ण होतील. त्यामुळे एक वेगळाच उत्साह आणि आत्मविश्वास जाणवेल. उद्योग व्यापारात प्रचंड विस्तार होईल. घरामध्ये तुमच्या मतांचा आदर केला जाईल. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. मनमोकळेपणाने संवाद होऊन नाते आणखी मजबूत होईल.
संबंधित बातम्या