Lakshmi Narayan Yog : १ वर्षानंतर कर्क राशीत जुळून येतोय 'लक्ष्मी नारायण' योग! 'या' राशींना मिळणार चांगला पगार
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lakshmi Narayan Yog : १ वर्षानंतर कर्क राशीत जुळून येतोय 'लक्ष्मी नारायण' योग! 'या' राशींना मिळणार चांगला पगार

Lakshmi Narayan Yog : १ वर्षानंतर कर्क राशीत जुळून येतोय 'लक्ष्मी नारायण' योग! 'या' राशींना मिळणार चांगला पगार

Published Jul 06, 2024 01:42 PM IST

Lakshmi Narayan Raj Yog 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल ३६५ दिवसांनंतर अर्थातच १ वर्षानंतर 'लक्ष्मी नारायण' हा शुभ राजयोग जुळून येत आहे.

लक्ष्मी नारायण राजयोग २०२४
लक्ष्मी नारायण राजयोग २०२४

ज्योतिषशास्त्रामध्ये विविध राजयोगांचा उल्लेख करण्यात आला आहे. हे राजयोग कुंडलीत असल्याने लोकांचे भाग्य अक्षरशः उजळून निघते. या लोकांना आयुष्यात सर्व भौतिक सुख प्राप्त होतात. व्यवसायापासून ते नोकरीपर्यंत, तसेच करिअर आणि लव्ह लाईफ, आर्थिक स्थितीपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये फायदा पाहायला मिळतो. कुंडलीत राजयोग असल्याने या लोकांना कधीच आर्थिक निकट भासत नाही. त्यामुळेच या राजयोगाला विशेष महत्व आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल ३६५ दिवसांनंतर अर्थातच १ वर्षानंतर हा शुभ राजयोग जुळून येत आहे. या राजयोगाचे नाव आहे 'लक्ष्मी नारायण राजयोग'. यंदाच्या जुलै महिन्यात हा राजयोग जुळून आला आहे. शुक्र आणि बुध ग्रहाच्या संयोगातून लक्ष्मी नारायण योगाची निर्मिती होणार आहे. महत्वाचे म्हणजे हा राजयोग कर्क राशीत तयार होत आहे. लक्ष्मी नारायण योगामुळे राशी चक्रातील काही राशींचे नशीबच पालटणार आहे. लक्ष्मी नारायण योगात या राशींना आर्थिक फायदा तर होणारच शिवाय चांगला पगार आणि बढतीसुद्धा मिळेल. पाहूया या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.

कर्क

कर्क राशीच्या लोकांना 'लक्ष्मी नारायण राजयोगा'चा चांगला फायदा मिळणार आहे. हा राजयोग कर्क राशीच्या लग्न घरात निर्माण होत आहे. याकाळात नोकरदार वर्गाला पदोन्नती आणि पगारवाढ मिळेल. समाजात तुम्हाला मानसन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. मनासारख्या गोष्टी घडत असल्याने आत्मविश्वास वाढेल. विवाहित लोकांचे वैवाहिक आयुष्य आणखी समृद्ध होईल. पतिपत्नीमधील प्रेम आणि आदर वाढेल. शिवाय अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. नवा व्यवसाय सुरु करण्याचा विचार असणाऱ्यांना हा काळ उत्तम आहे.

मकर

मकर राशीच्या लोकांना लक्ष्मी नारायण राजयोगाचा लाभ मिळणार आहे. कारण हा राजयोग मकर राशीच्या सातव्या घरात निर्माण होत आहे. याकाळात तुम्हाला जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनमोकळा संवाद होऊन नात्यातील गोडवा आणखी वाढेल. विवाहित जोडप्याच्या आयुष्यात सुखसमृद्धी नांदेल. धनलाभाचे प्रसंग घडतील. कमाईचे नवनवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. हातात पैसा आल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. हा काळ विद्यार्थ्यांसाठीसुद्धा अतिशय अनुकूल असणार आहे. अभ्यासात प्रगती सोबतच एखाद्या स्पर्धेत यशसुद्धा मिळेल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल.भूतकाळात केलेलया एखाद्या गुंतवणूकीचासुद्धा फायदा याकाळात दिसून येईल. लक्ष्मी नारायण राजयोगात गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक लाभ होईल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना लक्ष्मी नारायण योग अत्यंत लाभदायी ठरणार आहे. याकाळात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याचा योग आहे. तुम्हाला कार्यक्षेत्रात एक नवी ओळख मिळणार आहे. नोकरदार वर्गाची वेगाने प्रगती होईल. वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील. याचा फायदा तुम्हाला भविष्यात दिसून येईल.विवाहित लोकांना गृहसौख्य लाभेल. रिलेशनशीपमध्ये असणाऱ्यांना हा काळ चांगला असणार आहे. याकाळात एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल. आणि त्यातून आदर आणि प्रेम वाढीस लागेल. शिवाय याकाळात तुम्हाला अचानक धनलाभ होतील. अनपेक्षितपणे धनलाभ झाल्याने मन उत्साही होईल.

Whats_app_banner