शुक्र ग्रहाला सुख आणि समृद्धीच्या घडामोडींसाठी जबाबदार समजले जाते. ग्रह-नक्षत्र एका ठराविक काळानंतर राशीपरिवर्तन करत असतात. शुक्र लवकरच राशीपरिवर्तन करणार आहे. शुक्रवार १९ मे २०२४ रोजी शुक्र राशी परिवर्तन करीत वृषभ राशीत संक्रमण करणार आहे. सकाळी ८ वाजून ५१ मिनिटांनी हे संक्रमण होणार आहे. १९ मे पासून १२ मे २०२४ पर्यंत शुक्र वृषभ राशीत विराजमान असणार आहे. शास्त्रानुसार, शुक्र नेहमीच सर्व राशींना लाभदायक परिणाम देत असतो. मात्र जेव्हा शुक्राची अशुभ स्थिती तयार होते तेव्हा काही राशींना त्याचा नकारात्मक त्रास सहन करावा लागतो. यंदा शुक्राचे संक्रमण दोन राशींसाठी अशुभ ठरणार आहे.
येत्या १९ मे ते १२ जून दरम्यान होत असलेल्या शुक्र संक्रमणाचा मिथुन राशीवर नकारात्मक प्रभाव पडणार असल्याचे दिसून येत आहे. शुक्राने वृषभ राशीत संक्रमण केल्याने मिथुन राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुम्ही कोणत्याही व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवणे टाळावे. अथवा मोठी फसवणूक होऊ शकते. जास्त संपर्क नसलेल्या लोकांना महत्वाच्या गोष्टी सांगणे टाळा. असे लोक तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यांच्या सल्ल्याने केलेली आर्थिक गुंतवणूक तोट्याची ठरु शकते. या काळात कोणतेही नवे कार्य हाती घेताना त्याच्या सर्व बाजू पडताळून पाहा. कोणतेही कार्य घाईगडबडीत करु नका. अन्यथा त्याचे विपरीत परिणाम समोर येतील. या काळात आर्थिक स्थिती कमकुवत राहणार असल्याने खर्चावर नियंत्रण ठेवा. अडचणीतून जात असताना आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.
शुक्राच्या वृषभ राशीत संक्रमणाचा नकारात्मक परिणाम मिथुनसोबतच मीन राशीवरसुद्धा दिसून येणार आहे. या राशीतील लोकांना कामाच्या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त कष्ट करावे लागणार आहेत. अनेकांना अतोनात प्रयत्न करुनसुद्धा हाती घेतलेल्या कार्यात यश मिळणार नाही. बौद्धिक क्षमता असूनदेखील हातात आलेली कामे परत जाण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या हा काळ प्रतिकूल असणार आहे. कोणताही मोठा धनलाभ होणार नाही. याउलट नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. शुक्राच्या अशुभ प्रभावाने तुमचे खाजगी आयुष्यसुद्धा अडचणीत येऊ शकते. जोडीदारासोबत मतभेद होऊन नात्यात दुरावा येऊ शकतो. त्यामुळे नात्यामध्ये सामंजस्य ठेवणे उपयोगी ठरेल. लहानसहान गोष्टींवरुन घरच्यांसोबत वादविवाद होऊ शकतात. याकाळात आरोग्याची विशेष काळजी घ्या. अथवा एखादा आजार पाठ धरु शकतो.
शुक्र ग्रह नेहमीच शुभ योगाची निर्मिती करत असतो. त्यामुळे प्रत्येक राशीवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. परंतु ज्यावेळी शुक्राचे संक्रमण अशुभ असते , तेव्हा या राशींवर नकारात्मक पारिणाम दिसून येतो. शुक्राच्या अशुभ संक्रमणात शुक्राला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय शास्त्रात सांगितले जातात. तेच आपण जाणून घेणार आहोत. वैदिक शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ''ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः'' या मंत्राचा जप करणे लाभदायक ठरते. शुक्रवारी पांढऱ्या वस्तू अर्थातच तांदूळ, दूध, कपडे आणि सौभाग्याच्या वस्तू दान केल्यानेसुद्धा शुक्र ग्रहाची शुभ कृपा लाभते. शुक्राचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शुक्रवारी उपवास ठेवणेसुद्धा महत्वाचे ठरते. लक्ष्मीची पूजा केल्याने आणि सहा मुखी रुद्राक्ष घातल्यानेसुद्धा शुक्र ग्रह प्रभावीत होतो आणि त्यामुळे राशींमध्ये सकारात्मक गोष्टींना आकर्षित करण्याची क्षमता वाढीस लागते.
संबंधित बातम्या