Shukra Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या स्थानबदलामुळे बाराही राशींचे भविष्य ठरत असते. ग्रह आणि नक्षत्र एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करत असतात. या कालावधीत ते विविध योगांची निर्मिती करतात. या योगांचा चांगला आणि वाईट परिणाम राशी चक्रातील बाराही राशींवर दिसून येतो. अशुभ योगामुळे राशींना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. याउलट जर हे योग शुभ असतील तर त्या राशींचे नशीबच पालटते. आर्थिकवृद्धीपासून ते वैवाहिक आयुष्यापर्यंत सर्वच बाबींमध्ये मोठा सकारात्मक बदल दिसून येतो. येत्या जुलै महिन्यात शुक्र एक नव्हे, तर चक्क दोनवेळा राशीपरिवर्तन करणार आहे.
वैदिक शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. त्यानुसार त्या ग्रहांचा प्रभाव राशींवर पडत असतो. नऊ ग्रहांपैकी एक ग्रह असलेल्या शुक्र ग्रहाला वैदिक शास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. शुक्र ग्रहाला सौंदर्य, कला, बुद्धी, धनसंपत्ती, ऐश्वर्य या गोष्टींसाठी कारक समजले जाते. अर्थातच शुक्र ग्रह प्रामुख्याने राशींवर सकारात्मक प्रभाव पाडत असतो. त्यामुळेच शुक्र ग्रहाचे राशीपरिवर्तन अत्यंत खास समजले जाते. यंदा जुलै महिन्यात शुक्र एक नव्हे तर तब्बल दोनवेळा राशी परिवर्तन करणार आहे. या शुक्र गोचरने काही राशींवर अत्यंत शुभ प्रभाव पडणार आहे. या प्रभावाने त्या राशींचे नशीब अक्षरशः चमकणार आहे.
एका ठराविक काळानंतर ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करत असतात. येत्या जुलै महिन्यात शुक्रसुद्धा चक्क दोनदा राशीपरिवर्तन करणार आहे. सध्या शुक्र राशीचक्रातील तिसऱ्या क्रमांकाची राशी असणाऱ्या मिथुन राशीत विराजमान आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे ७ जुलै रोजी शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यांनंतर पुन्हा ३१ जुलै रोजी शुक्र स्वतःची राशी असणाऱ्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या या राशीपरिवर्तनाने काही शुभ योग घटित होणार आहेत. आणि त्यांचा फायदा काही राशींना मिळणार आहे. पाहूया त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
शुक्र ग्रहाच्या राशीपरिवर्तनाने मेष राशीला लाभ मिळणार आहे. कारण शुक्र ग्रह मेष राशीच्या चौथ्या आणि पाचव्या भावात भ्रमण करणार आहे. शुक्र गोचरदरम्यान या राशीच्या लोकांना आयुष्यात सकारत्मक बदल दिसून येतील. व्यवसाय-उद्योग करणाऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल. घरामध्ये विलासी-महागड्या वस्तूंची खरेदी होईल. त्यामुळे कुटुंबातील सदस्य आनंदी आणि उत्साहित असतील. शेअर मार्केट किंवा रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना मोठा आर्थिक फायदा होईल. त्यातून आर्थिक स्थिती आणखी मजबूत होण्यास मदत होईल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. त्यामुळे तुमच्याबद्दल इतरांना आदर वाटेल. ऐषारामी आयुष्य जगण्याकडे कल राहील.
कर्क राशीसाठीसुद्धा शुक्र राशीपरिवर्तन लाभदायक ठरणार आहे. याकाळात कमाईचे तुमच्यासाठी खुले होतील. धनलाभ होऊन आर्थिक बचत मोठ्या प्रमाणात होईल. तुमच्या मितभाषी आणि गोड स्वभावामुळे तुमचे व्यक्तिमत्व आणखी खुलून येईल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. हातात घेतलेल्या एखाद्या महत्वाच्या कामात कुटुंबाबतील सदस्यांचे सहकार्य लाभेल. त्यामुळे मनावरचा ताण नाहीसा होईल.
शुक्राचे गोचर तूळ राशीसाठी त्यांत शुभ लाभ देणारा असेल. याकाळात तुमची चांगली प्रगती होईल. पगारवाढ होऊन आर्थिक उत्पन्न वाढेल. कार्यक्षेत्रात नावलौकिक होईल. उद्योग-व्यवसायात मनासारखे यश मिळेल. तसेच याकाळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक स्थिती चांगली असलयाने जमीन अथवा घर खरेदीचा विचार मनात येऊ शकतो. प्रयत्न केल्याने यश नक्की मिळते या गोष्टीवर पूर्ण विश्वास बसेल.
संबंधित बातम्या