मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Shukra Gochar 2024 : शुक्राचं राशी परिवर्तन या राशींसाठी ठरणार उत्तम! होणार पैशांचा पाऊस

Shukra Gochar 2024 : शुक्राचं राशी परिवर्तन या राशींसाठी ठरणार उत्तम! होणार पैशांचा पाऊस

HT Marathi Desk HT Marathi
May 18, 2024 02:21 PM IST

shukra rashi parivartan 2024 : शुक्राच्या हालचालींवर महत्वाचे योग घडून येत असतात. लवकरच शुक्र मेष राशीतून निघून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

शुक्राचं राशी परिवर्तन या राशींसाठी ठरणार उत्तम! होणार पैशांचा पाऊस
शुक्राचं राशी परिवर्तन या राशींसाठी ठरणार उत्तम! होणार पैशांचा पाऊस

shukra rashi parivartan 2024 : जोतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यात ग्रह-नक्षत्रांच्या हालचाचालींचा मोठा प्रभाव पडतो. ठराविक वेळेनंतर राशीचक्रातील बारा राशींमध्ये हे ग्रह संक्रमण करत असतात. त्यामुळे राशींवर विविध परिणाम दिसून येत असतात. 

शास्त्रात शुक्र ग्रहाला विशेष महत्व आहे. शुक्राला धन,सौंदर्य, प्रेम, विलासता आणि कलेचे प्रतीक मानले जाते. तसेच शुक्राच्या स्थितीवर गृहसौख्य लाभते. शुक्राला देवतांचा गुरु म्हणून संबोधले जाते. त्यामुळे शुक्राच्या हालचालींवर महत्वाचे योग घडून येत असतात. लवकरच शुक्र मेष राशीतून निघून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या या राशीपरिवर्तनाने तब्बल १२ वर्षानांतर गजलक्ष्मी राजयोग जुळून येत आहे. उद्या म्हणजेच १९ मे २०२४ रोजी सकाळी ८ वाजून ५१ मिनिटांनी शुक्र राशीपरिवर्तन करणार आहे.

राशींवर कसा असेल शुक्र संक्रमणाचा प्रभाव?

जोतिष अभ्यासानुसार, ज्या राशींवर शुक्राचा प्रभाव असतो त्या राशी सर्वच बाबतीत अतिशय मजबूत राहतात. शुक्राच्या साहाय्याने या राशींची आर्थिक स्थिती सुधारते, घरामध्ये सुख समृद्धी येते. जोडीदारासोबत नातेसंबंध सुधारुण प्रेम वाढीस लागते. परंतु ज्या लोकांच्या राशीत सूर्याचा प्रभाव कमी असतो त्यांना पैशांची चणचण भासते. मतभेद होऊन नातेसंबंध बिघडतात. घरामध्ये मनःस्तापाच्या घटना घडतात.

कोणत्या राशींना होणार शुक्र संक्रमणाचा फायदा?

वृषभ

शुक्र मेष राशी सोडून वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार असल्याने वृषभ राशीला याचा विशेष लाभ होणार आहे. शुक्राच्या प्रभावाने या राशीच्या लोकांचे नशीबच उघडणार आहे. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. सर्वच क्षेत्रातील लोकांची उल्लेखनीय प्रगती होईल. शिवाय कमाईचे नवे स्तोत्र उपलब्ध होतील. नोकरदारवर्गाला करिअरच्या दृष्टीने नव्या संधी मिळतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल.

कन्या

कन्या राशीच्या लोकांवरसुद्धा शुक्र संक्रमणाचा चांगला प्रभाव असणार आहे. या संक्रमणामुळे कन्या राशीच्या लोकांची लव लाईफ सुधारणार आहे. जोडीदारासोबत मतभेद संपुष्ठात येऊन नाते अधिक दृढ होणार आहे. पती-पत्नीमधील विश्वास वाढून गृहसौख्य लाभणार आहे.

तूळ

शुक्र संक्रमणाच्या आठव्या तिथीत तूळ राशीवरसुद्धा उत्तम प्रभाव पडणार आहे. या राशीतील लोकांचे करिअर अचानक यशाच्या शिखरावर पोहोचणार आहे. हातात घेतलेले काम चांगल्याप्रकारे पूर्ण होईल. तुमच्या कलागुणांना लोकांची दाद मिळेल. समाजात मानसन्मान वाढून तुमची प्रतिमा आणखी मजबूत होईल. मात्र वैवाहिक आयुष्यात काही अडचणी उद्भवतील.

मीन

मीन राशीवरसुद्धा शुक्र संक्रमणाचा चांगला परिणाम दिसून येणार आहे. कामाच्या निमित्ताने काहीशी धावपळ होईल. मात्र त्यामुळे यशसुद्धा पदरी पडेल. करिअरमध्ये नवनव्या संधी उपलब्ध होतील. या राशीच्या लोकांची लव लाईफ उत्तम राहणार आहे. जोडीदारासोबत नातेसंबंध सुधारुण प्रेम आणि विश्वास अधिक घट्ट होईल.

WhatsApp channel